WIND vs WPAK: पहिल्याच दिवशी इंडिया-पाकिस्तान आमेनसामने, जाणून घ्या वेळापत्रक

India vs Pakistan Womens Asia Cup 2024: वूमन्स आशिया कप 2024 स्पर्धेतील पहिल्याच दिवशी टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान असा महामुकाबला होणार आहे.

WIND vs WPAK: पहिल्याच दिवशी इंडिया-पाकिस्तान आमेनसामने, जाणून घ्या वेळापत्रक
wind vs wpak
Follow us
| Updated on: Jul 18, 2024 | 12:18 AM

वूमन्स आशिया कप 2024 स्पर्धेला शुक्रवार 19 जुलैपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा श्रीलंकेकडे आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार असून 10 दिवस थरार रंगणार आहे. या 8 संघांमध्ये टीम इंडिया, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, यूएई, मलेशिया आणि थायलँडचा समावेश आहे. स्पर्धेतील 8 संघांना 4-4 या हिशोबाने 2 गटात विभागलं गेलं आहे. त्यानुसार यजमान श्रीलंका, बांगलादेश, थायलँड आणि मलेशिया हे संघ बी ग्रुपमध्ये आहेत. तर टीम इंडिया, पाकिस्तान, नेपाळ आणि यूएई हे संघ ए ग्रुपमध्ये आहेत. स्पर्धेत एकूण 15 सामने होणार आहेत. या स्पर्धेत 2 कट्टर प्रतिस्पर्धी इंडिया-पाकिस्तान आमनेसामने असणार आहेत.

वूमन्स आशिया कप स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात यूएई विरुद्ध नेपाळ आमेसामने असणार आहेत. या सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे. तर त्यानंतर स्पर्धेतील दुसऱ्या सामन्या इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात कडवी झुंज होणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होईल. या सामन्याचं आयोजन हे रनगिरी दांबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियम येथे करण्यात आलं आहे. हरमनप्रीत कौर हीच्याकडे भारतीय संघाचं नेतृत्व आहे. तर निदा डार पाकिस्तानची सूत्र सांभाळणार आहे.

वूमन्स टीम इंडियाचं वेळापत्रक

आशिया कप 2024 स्पर्धेसाठी वूमन्स टीम इंडिया: हरमनप्रीत कौर (कॅप्टन), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमा रोड्रिग्स, ऋचा घोष (विकेटकीपर), उमा छेत्री (विकेटकीपर), पूजा वस्त्राकार, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंह ठाकुर, दयालन हेमलता, आशा शोभना, राधा यादव, श्रेयंका पाटील आणि सजाना संजीवन.

वूमन्स पाकिस्तान क्रिकेट टीम: निदा डार (कॅप्टन), आलिया रियाज, डायना बेग, फातिमा सना, गुल फिरोजा, इरम जावेद, मुनीबा अली, नजीहा अल्वी, नाशरा संधू, ओमैमा सोहेल, सादिया इकबाल, सिदरा अमीन, सैयदा अरूब शाह, तस्मिया रुबाब आणि तुबा हसन.

Non Stop LIVE Update
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?.
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.