WIND vs WBAN: टीम इंडियाची फायनलध्ये धडक, बांगलादेशवर10 विकेट्सने विजय, शफाली-स्मृतीची धमाकेदार बॅटिंग
India Women vs Bangladesh Women 1st Semi Final Match Result: टीम इंडियाने बांगलादेशचा 10 विकेट्सने धुव्वा उडवत आशिया कप 2024 स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.
वूमन्स टीम इंडियाने आशिया कप 2024 स्पर्धेतील अंतिम फेरीत धडक मारली आहे. टीम इंडियाने बांगलादेशवर 10 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे. बांगलादेशने भारताला विजयासाठी 81 धावांचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियाच्या शफाली वर्मा आणि स्मृती मंधाना या सलामी जोडीनेच हे आव्हान 9 ओव्हर राखून पूर्ण केलं. टीम इंडियाने 11 ओव्हरमध्ये 83 रन्स केल्या. पूर्ण केलं. टीम इंडियाचा हा या स्पर्धेतील सलग आणि एकूण चौथा विजय ठरला. आता श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील विजेता संघाविरुद्ध टीम इंडियाचा अंतिम फेरीत आशिया कप ट्रॉफीसाठी महामुकाबला होईल.
शफाली वर्मा आणि स्मृती मंधाना या सलामी जोडीने विस्फोटक फलंदाजी केली. स्मृतीने टीम इंडियासाठी सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. स्मृतीने 141.03 च्या स्ट्राईक रेटने 9 चौकार आणि 1 षटकारासह 39 चेंडूंमध्ये 55 धावांची नाबाद अर्धशतकी केली. तर शफाली वर्माने तिला चांगली साथ दिली. शफाली 28 बॉलमध्ये 92.86 च्या स्ट्राईक रेटने 2 फोरसह नॉट आऊट 26 रन्स केल्या. बांगलादेशकडून 5 जणींनी बॉलिंग केली. मात्र एकीलाही ही जोडी फोडता आली नाही.
पहिल्या डावात काय झालं?
दरम्यान त्याआधी बांगलादेशने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र भारतीय गोलंदाजांसमोर 100 पारही पोहचता आलं नाही. राधा यादव आणि रेणूका सिंग या दोघींसमोर बांगलादेशला 20 ओव्हरमध्ये 80 धावांपर्यंतच पोहचता आलं. बांगलादेशकडून कॅप्टन निगर सुल्ताना हीने सर्वाधिक 32 धावा केल्या. तर शोरना अक्टरने नॉट आऊन 19 रन्स केल्या. तर टीम इंडियाकडून राधा यादव आणि रेणूका सिंह या दोघींनी 3-3 विकेट्स घेतल्या. तर पूजा वस्त्राकर आणि दीप्ती शर्मा या दोघींनी 1-1 विकेट घेतली.
टीम इंडियाची फायनलमध्ये धडक
𝐈𝐧𝐭𝐨 𝐭𝐡𝐞 𝐟𝐢𝐧𝐚𝐥 🙌🙌
A formidable win against Bangladesh takes #TeamIndia into the Final and makes it 4⃣ wins in 4⃣ matches 👌👌
Scorecard ▶️ https://t.co/JwoMEaSoyn#INDvBAN | #WomensAsiaCup2024 | #ACC | #SemiFinal pic.twitter.com/2E1htJVcCp
— BCCI Women (@BCCIWomen) July 26, 2024
वूमन्स टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : हरमनप्रीत कौर (कर्णधार), शफाली वर्मा, स्मृती मानधना, उमा चेत्री, जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, तनुजा कंवर आणि रेणुका ठाकूर सिंग.
बांगलादेश वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : निगार सुल्ताना (कॅप्टन आणि विकेटकीपर), दिलारा अक्टर, मुर्शिदा खातून, रुमाना अहमद, इश्मा तंजीम, रितू मोनी, राबेया खान, शोर्ना अक्टर, नाहिदा अक्टर, जहांआरा आलम आणि मारुफा अक्टर.