WPL 2025 : आयपीएलनंतर वुमन्स प्रीमियर लीग फ्रेंचायझींकडून रिटेन्शन यादी जाहीर, वाचा कोणत्या संघात कोण ते

आयपीएलनंतर आता वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेचं बिगुल वाजलं आहे. त्यासाठी फ्रेंचायझींनी कंबर कसली असून पाचही संघांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, यूपी वॉरियर्स, गुजरात जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्सने रिटेन केलेल्या आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची नाव जाणून घ्या.

WPL 2025 : आयपीएलनंतर वुमन्स प्रीमियर लीग फ्रेंचायझींकडून रिटेन्शन यादी जाहीर, वाचा कोणत्या संघात कोण ते
Follow us
| Updated on: Nov 07, 2024 | 8:41 PM

वुमन्स प्रीमियर लीगच्या तिसऱ्या पर्वासाठी पाचही फ्रेंचायझी सज्ज झाल्या आहेत. पहिल्या पर्वात मुंबई इंडियन्सने बाजी मारली होती. तर दुसऱ्या पर्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पत्ता चालला. त्यामुळे तिसऱ्या पर्वात कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. असं असताना तिसऱ्या पर्वापूर्वी रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी समोर आली आहे. मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, यूपी वॉरियर्स, गुजरात जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझींनी रिटेन केलेल्या आणि संघातून सोडलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. मुंबई इंडियन्स आणि आरसीबीने प्रत्येकी 14 खेळाडूंना कायम ठेवले आहे. तर यूपी वॉरियर्सने 15 खेळाडूंना कायम ठेवले आहे. दिल्लीने एकूण चार खेळाडूंना रिलीज केलं आहे. तर गुजरातने संघातील सात खेळाडूंना मोकळं केलं आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु

रिटेन केलेले खेळाडू: स्मृती मानधना (कर्णधार), सबिनेनी मेघना, ऋचा घोष, एलिस पेरी, जॉर्जिया वेरेहम, श्रेयंका पाटील, आशा शोभना, सोफी डिव्हाईन, रेणुका सिंग, सोफी मॉलिनक्स, एकता बिश्त, केट क्रॉस, कनिका आहुजा, डॅनियल व्याट.

रिलीज केलेले खेळाडू: दिशा कसाट, इंद्राणी रॉय, नदीन डी क्लार्क, शुभा सतीश, श्रद्धा पोकरकर, सिमरन बहादूर, हेदर नाइट.

मुंबई इंडियन्स

रिटेन केलेले खेळाडू : हरमनप्रीत कौर (कर्णधार), पूजा वस्त्राकर, यास्तिका भाटिया, नॅट सिव्हर-ब्रंट, हेली मॅथ्यूज, अमेलिया केर, क्लो ट्रायॉन, अमनजोत कौर, सायका इशाक, जिंतीमणी कलिता, एस सजना, कीर्तन बालकृष्णन, शबनीम इस्माईल.

रिलीज केलेले खेळाडू: प्रियांका बाला, हुमैरा काझी, फातिमा जफर, ईसी वांग.

दिल्ली कॅपिटल्स

रिटेन केलेले खेळाडू: शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, तानिया भाटिया, राधा यादव, अरुंधती रेड्डी, शिखा पांडे, स्नेहा दीप्ती, मिन्नू मणी, तितास साधू, मेग लॅनिंग (कर्णधार), ॲलिस कॅप्सी, मारिजाने कप्प, जेस जोनासेन, ॲनाबेल सदरलँड.

रिलीज केलेले खेळाडू: लॉरा हॅरिस, अश्विनी कुमारी, पूनम यादव, अपर्णा मंडल.

यूपी वॉरियर्स

रिटेन केलेले खेळाडू: ॲलिसा हिली (कर्णधार), ताहलिया मॅकग्रा, ग्रेस हॅरिस, दीप्ती शर्मा, श्वेता सेहरावत, सोफी एक्लेस्टोन, चामरी अटापट्टू, किरण नवगिरे, राजेश्वरी गायकवाड, अंजली सरवानी, उमा छेत्री, पूनम ठाकोनर, समादाना खमाना, सायमा ठाकोर

रिलीज केलेले खेळाडू : लक्ष्मी यादव, पार्श्वी चोप्रा, लॉरेन बेल, एस यशश्री.

गुजराज जायंट्स

रिटेन केलेले खेळाडू: हरलीन देओल, दयालन हेमलता, तनुजा कंवर, शबनम शकील, मन्नत कश्यप, वेदा कृष्णमूर्ती, तरन्नुम पठाण, सायली सतगरे, मेघना सिंग, त्रिशा पूजाता, प्रिया मिश्रा, बेथ मुनी, ऍशले गार्डनर, लॉरा वॉलवर्ड, कॅथरीन बी

रिलीज केलेले खेळाडू: स्नेह राणा, कॅथरीन ब्राइस, त्रिशा पूजाता, वेदा कृष्णमूर्ती, तरन्नुम पठाण, ली ताहुहू.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.