AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WPL 2023: Mumbai Indians च्या मुलीची कमाल, जाणून घ्या कोणाकडे आहे ऑरेंज आणि पर्पल कॅप?

WPL 2023 Orange Cap and Purple Cap Winner: BCCI ने आयोजित केलेली पहिली वूमेन्स प्रीमियर लीग जोरात सुरु आहे. ऑरेंज आणि पर्पल कॅपच्या शर्यतीत दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्सच्या खेळाडूचा बोलबाला आहे.

WPL 2023: Mumbai Indians च्या मुलीची कमाल, जाणून घ्या कोणाकडे आहे ऑरेंज आणि पर्पल कॅप?
| Updated on: Mar 10, 2023 | 9:25 AM
Share

WPL 2023 : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सला महिला प्रीमियर लीगमध्ये पराभवाचा पहिला धक्का दिला. मुंबईने दिल्लीला 8 विकेटने हरवून विजयाची हॅट्ट्रीक केली. या मॅचनंदर ऑरेंज आणि पर्पल कॅपच्या शर्यतीत दिल्लीची कॅप्टन मेग लेनिंग आणि मुंबईची नवोदीत खेळाडू सायका इसाकचा दबदबा आहे. लेनिंगने मुंबई विरुद्ध 41 चेंडूत 43 धावा ठोकल्या. तीन सामन्यात लेनिंगच्या नावावर आता 185 धावा आहेत. तिने आतापर्यंत 2 अर्धशतक झळकावली आहेत. लेनिंग लीगमध्ये सर्वाधिक धावा बनवणारी फलंदाज आहे. त्यामुळे ऑरेंज कॅप तिच्याकडे आहे.

लेनिंगने अंतर अजून वाढवलं

तिला मुंबई इंडियन्सच्या हॅली मॅथ्यूजकडून टक्कर मिळतेय. मॅथ्यूज 156 धावांसह ऑरेंज कॅपच्या शर्यतीत दुसऱ्या स्थानावर आहे. लेनिंगने दोघींमधील अंतर अजून वाढवलय.

मुंबईच्या मुलीची कमाल

पर्पल कॅप मुंबई इंडियन्सची गोलंदाज सायका इसाककडे आहे. लीगच्या सुरुवातीपासूनच सायकाकडे पर्पल कॅप आहे. 3 मॅचमध्ये तिने 9 विकेट घेतल्यात. 2 वेळा तिने 3 पेक्षा जास्त विकेट घेतलेत. तिला मॅथ्यूजकडून आव्हान मिळतय. मॅथ्यूज 6 विकेटसह पर्पल कॅपच्या शर्यतीत दुसऱ्या नंबरवर आहे. मुंबईने रोखला दिल्लीचा विजय रथ

दरम्यान वूमन्स प्रीमिअर लीग स्पर्धेतील सातवा सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिट्ल्स यांच्यात झाला. प्रथम बॅटींग करणाऱ्या दिल्ली कॅपिट्ल्सचा डाव मुंबईने अवघ्या 105 धावांवर गुंडाळला. दिल्लीच्या या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई संघाने 15 ओव्हरमध्ये टार्गेट पूर्ण करत 8 विकेट्सने विजय मिळवला. मुंबईकडून यास्तिका भाटियाने सर्वाधिक 41 धावा करत संघाच्या विजयामध्ये मोलाची भूमिका बजावली. दोन्ही संघांनी दोन सामने जिंकले होते. मात्र आता सलग तिसरा विजय साकारत मुंबई इंडियन्सने दिल्लीचा विजयरथ रोखला आहे.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.