INDW vs NZW : टीम इंडियासमोर न्यूझीलंडचं आव्हान, हरमनप्रीत-शफालीच्या कामगिरीमुळे चिंता!

India Women vs New Zealand Women: वूमन्स टीम इंडियासमोर सलामीच्या सामन्यात न्यूझीलंडचं आव्हान असणार आहे. मात्र त्याआधी शफाली वर्मा आणि कॅप्टन स्मृती मंधाना या दोघांची कामगिरी ही टीम इंडियासाठी चिंताजनक बाब आहे.

INDW vs NZW : टीम इंडियासमोर न्यूझीलंडचं आव्हान, हरमनप्रीत-शफालीच्या कामगिरीमुळे चिंता!
womens team india
Follow us
| Updated on: Oct 03, 2024 | 11:03 PM

वूमन्स टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेला दणक्यात सुरुवात झाली. सलामीच्या सामन्यात बांगलादेशने स्कॉटलँडवर विजय मिळवला. तर टीम इंडिया या स्पर्धेत हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात खेळणार आहे. टीम इंडियाचा या स्पर्धेतील पहिला सामना हा 4 ऑक्टोबर रोजी होणार आहे. टीम इंडियासमोर सलामीच्या सामन्यात 2 वेळा टी 20 वर्ल्ड कप उपविजेत्या असलेल्या न्यूझीलंडचं आव्हान असणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. टीम इंडियाचा हा सामना जिंकून विजयी सुरुवात करण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यात टीम इंडियाला किती यश येणार? हे सामन्यानंतरच स्पष्ट होईल.

न्यूझीलंड विरूद्धच्या सामन्याआधी सलामीवीर शफाली वर्मा आणि कॅप्टन हरमनप्रीत कौर या दोघांच्या कामगिरीमुळे टीम इंडियाची चिंता वाढली आहे. या दोघींनी गेल्या काही दिवसांमध्ये धावांसाठी संघर्ष करावा लागला आहे. तसेच स्मृती मंधाना हीलाही तिच्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. शफालीने टी 20i क्रिकेटमध्ये 25 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. शफालीने विंडिज विरूद्धच्या सराव सामन्यात फक्त 7 धावा केल्या होत्या. तसेच कर्णधार हरमनप्रीत कौरची बॅट न चालणं ही भारतासाठी चिंतेची बाब आहे.

हरमनप्रीत 2019 नंतर टी 20 क्रिकेटमध्ये 120 पेक्षा अधिकच्या स्ट्राईक रेटने धावा करणारी एकमेव फलंदाज आहे. हरममने गेल्या काही दिवसात वूमन्स हन्ड्रेड आणि वूमन्स बिग बॅश लीग या दोन्ही स्पर्धांसाठी तिला कोणही आपल्या ताफ्यात घेतलं नाही, अर्थात ती अनसोल्ड राहिली. तसेच हरमनप्रीतला वूमन्स प्रीमियर लीगमध्ये हरमनला काही खास करता आलं नाही. त्यामुळे आता कॅप्टन हरमन न्यूझीलंड विरुद्ध कशी कामगिरी करते? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

टीम इंडिया: हरमनप्रीत कौर (कर्णधार), शफाली वर्मा, स्मृती मंधाना, जेमिमा रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, श्रेयंका पाटील, अरुंधती रेड्डी, राधा यादव, रेणुका ठाकूर सिंग, दयालन हेमलता, सजना, यास्तिका भाटिया आणि आशा शोभना.

न्यूझीलंड वूमन्स टीम : सोफी डिव्हाईन (कॅप्टन), सुझी बेट्स, अमेलिया केर, ब्रुक हॅलिडे, मॅडी ग्रीन, इसाबेला गेज (विकेटकीपर), हॅना रोवे, रोझमेरी मायर, ईडन कार्सन, फ्रॅन जोनास, ली ताहुहू, लेह कॅस्परेक, जेस केर, मॉली पेनफोल्ड आणि जॉर्जिया प्लिमर.

संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.