Women’s T20 World Cup, SA vs ENG : नाणेफेकीचा कौल दक्षिण अफ्रिकेच्या बाजूने, कर्णधार लॉरा म्हणाली…

वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या नवव्या सामन्यात इंग्लंड आणि दक्षिण अफ्रिका हे संघ आमनेसामने आले आहेत. या गटात चुरशीची लढाई पाहायला मिळत आहे. चार संघांनी प्रत्येकी दोन गुण मिळवले आहेत. त्यामुळे उर्वरित प्रत्येक सामन्याचं महत्त्व वाढलं आहे.

Women's T20 World Cup, SA vs ENG : नाणेफेकीचा कौल दक्षिण अफ्रिकेच्या बाजूने, कर्णधार लॉरा म्हणाली...
Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Oct 07, 2024 | 7:12 PM

वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या साखळी फेरीत इंग्लंड आणि दक्षिण अफ्रिका हे संघ आमनेसामने आले आहेत. दोन्ही संघांनी या स्पर्धेतील पहिला सामना जिंकलेला आहे. त्यामुळे आता कोण बाजी मारणार? याची उत्सुकता लागून आहे. नाणेफेकीचा कौल दक्षिण अफ्रिकेच्या बाजूने लागला. दक्षिण अफ्रिकेची कर्णधार लॉरा वॉल्वार्डने क्षणाचाही विलंब न करता प्रथम फलंदाजीला प्राधान्य दिलं. लॉरा वोल्वार्ड म्हणाली की, ‘आम्ही प्रथम फलंदाजी करू. खेळपट्टी थोडी स्लो दिसत आहे. आशा आहे की, आम्ही बोर्डवर चांगली टोटल मिळवू आणि नंतर त्याचा बचाव करू.एक विजय आम्हाला गटात 2-0 वर जाण्यास मदत करेल. आम्ही अद्याप परिपूर्ण खेळ खेळू शकलो नाही. सर्व आघाड्यांमध्ये छोट्या सुधारणा केल्या जाऊ शकतात. आम्ही त्याच संघासह मैदानात उतरणार आहोत.’

दुसरीकडे, इंग्लंडची कर्णधार हिदर नाइटने सांगितलं की, ‘आम्हीही प्रथम फलंदाजी केली असती. पण आता आम्हाला प्रथम चेंडूने सामना करावा लागेल. फलंदाजीसाठी परिस्थिती अवघड आहे. आम्ही कसं खेळायचं यावर आम्ही चर्चा केली आहे.मागच्या वेळी आम्ही ज्या परिस्थितीचा सामना केला होता त्यापेक्षा खूप वेगळी परिस्थिती आहे. हा एक दर्जेदार संघ आहे. आम्हीही त्याच संघासह मैदानात उतरू.’

ब गटात वेस्ट इंडिजने एका सामन्यात विजय आणि एका सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. दोन गुणांसह चांगला नेट रनरेट असल्याने टॉपला आहे. वेस्ट इंडिजचा नेट रनरेट हा +1.154 इतका आहे. इंग्लंड दुसऱ्या स्थानावर असून 2 गुण आणि नेट रनरेट +1.050 इतका आहे. दक्षिण अफ्रिका संघ तिसऱ्या स्थानावर असून नेट रनरेट हा +0.773 इतका आहे. तर बांगलादेशचा संघ 2 सामन्यापैकी एका सामन्यात विजय मिळवून 2 गुणांसह -0.125 नेट रनरेटसह चौथ्या स्थानवर आहे. स्कॉटलंडने दोन पैकी दोन सामने गमावले आहेत. त्यामुळे स्कॉटलंडचं स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे.

दोन्ही संघाची प्लेइंग 11

इंग्लंड महिला (प्लेइंग इलेव्हन): माईया बाउचियर, डॅनिएल व्याट-हॉज, नॅट सायव्हर-ब्रंट, हीदर नाइट (कर्णधार), ॲलिस कॅप्सी, एमी जोन्स (विकेटकीपर), डॅनियल गिब्सन, शार्लोट डीन, सोफी एक्लेस्टोन, सारा ग्लेन, लिन्से स्मिथ.

दक्षिण आफ्रिका महिला (प्लेइंग इलेव्हन): लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), तझमिन ब्रिट्स, मारिजाने कॅप, ॲनेके बॉश, सुने लुस, क्लो ट्रायॉन, नादिन डी क्लर्क, ॲनेरी डेर्कसेन, सिनालो जाफ्ता (विकेटकीपर), नॉनकुलुलेको म्लाबा, अयाबोंगा खाका

'तेवढ्याच उंचीवरून उडी मारून दाखवावी', राज ठाकरेंना झिरवळांचं चॅलेंज
'तेवढ्याच उंचीवरून उडी मारून दाखवावी', राज ठाकरेंना झिरवळांचं चॅलेंज.
'काँग्रेस उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होऊ देणार नाही तर...'
'काँग्रेस उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होऊ देणार नाही तर...'.
'तुम्ही फक्त खोटे छत्रपती होऊ शकतात', कोल्हेंच्या टीकेवर कोणाचा पलटवार
'तुम्ही फक्त खोटे छत्रपती होऊ शकतात', कोल्हेंच्या टीकेवर कोणाचा पलटवार.
नवजात बालकं आणि अर्भकांचा हृदयरोग : एक गंभीर सार्वजनिक आरोग्य समस्या
नवजात बालकं आणि अर्भकांचा हृदयरोग : एक गंभीर सार्वजनिक आरोग्य समस्या.
रामराजे निंबाळकर तुतारी हाती घेणार? शरद पवार यांनी काय दिले संकेत?
रामराजे निंबाळकर तुतारी हाती घेणार? शरद पवार यांनी काय दिले संकेत?.
सूरज चव्हाणची tv9 मराठीशी खास बातचित; लग्नाचा प्लान अन् कशी हवी मुलगी?
सूरज चव्हाणची tv9 मराठीशी खास बातचित; लग्नाचा प्लान अन् कशी हवी मुलगी?.
भरधाव वेगाने हा उंदीरमामा पालकमंत्री झाला, उत्तम जानकरांचा रोख कोणावर?
भरधाव वेगाने हा उंदीरमामा पालकमंत्री झाला, उत्तम जानकरांचा रोख कोणावर?.
ठाकरे सेनेला धक्का, किरण सामंत यांना तिकीट मिळणार? उदय सामंत म्हणाले..
ठाकरे सेनेला धक्का, किरण सामंत यांना तिकीट मिळणार? उदय सामंत म्हणाले...
साहित्यिकांमधील धमक कमी झालीय; राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
साहित्यिकांमधील धमक कमी झालीय; राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?.
बुजुर्ग म्हणावं तेच त्यांच्या नादी... राज ठाकरेंचा शरद पवारांवर निशाणा
बुजुर्ग म्हणावं तेच त्यांच्या नादी... राज ठाकरेंचा शरद पवारांवर निशाणा.