SAw Vs WIw : वेस्ट इंडिजचं दक्षिण अफ्रिकेसमोर 119 धावांचं आव्हान

वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत दक्षिण अफ्रिका आणि वेस्ट इंडिज हे संघ आमनेसामने आले आहेत. वेस्ट इंडिजने दक्षिण अफ्रिकेसमोर विजयासाठी धावांचं आव्हान ठेवलं आहे. आता दक्षिण अफ्रिकन संघ हे आव्हान गाठतो का? याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.

SAw Vs WIw : वेस्ट इंडिजचं दक्षिण अफ्रिकेसमोर 119 धावांचं आव्हान
Image Credit source: Proteas Women Twitter
Follow us
| Updated on: Oct 04, 2024 | 5:04 PM

वेस्ट इंडिज आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील तिसरा सामना सुरु आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल दक्षिण अफ्रिकेच्या बाजूने लागला. दक्षिण अफ्रिकेने मैदानाचा अंदाज घेत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दक्षिण अफ्रिकेची कर्णधार लॉरा वॉल्ववार्ड्टने धावसंख्या गाठणं सोपं असल्याचं म्हंटलं. तसेच पहिल्या डावात फिरकीपटूला मदत असं सांगितलं होतं. झालंही तसंच नॉनकुलुलेको मलाबाने वेस्ट इंडिजचं कंबरडं मोडलं. 4 षटकात 29 धावा देत आघाडीचे चार फलंदाज झटपट बाद केले. त्यामुळे वेस्ट इंडिजला मोठी धावसंख्या उभारताना अडचण आली. एकीकडे झटपट विकेट जात असताना वन डाऊन आलेल्या सॅफनी टेलरने डाव सावरला. पण दुसऱ्या बाजूने तिला काही साथ मिळाली नाही. समोरून झटपट विकेट जात होते. संघावरील दडपण दूर करण्याचा तिने पूरेपूर प्रयत्न केला. वेस्ट इंडिजने 20 षटकात 6 गडी गमवून 118 धावा केल्या आणि विजयासाठी 119 धावांचं आव्हान दिलं आहे.

वेस्ट इंडिजकडून कर्णधार हिले मॅथ्यूज आमि क्विना जोसेफ ही जोडी मैदानात उतरली होती. या दोघींनी सावध सुरुवात केली खरी पण संघाच्या 15 धावा असताना हिलेने चूक केली. मारिजाने कॅपच्या गोलंदाजीवर फटका मारताना चुकली आणि हातात झेल दिला.त्यानंतर फिरकीपटू नॉनकुलुलेको मलाबा एक एक करून विकेट घेण्यास सुरुवात केली. क्वेना जोसेफला 4 धावांवर असताना त्रिफळाचीत केलं. त्यानंतर मारिजाने कॅपने डिएंड्राची विकेट काढली आणि जल्लोष केला. कारण तिची विकेट खूपच महत्त्वाची होती. शेमेन कॅम्पबेल 17, चिनेल हेन्री 0, आलिया ॲलेने 7 धावा करून तंबूत परतले. स्टॅफनी टेलर नाबाद 44 आणि झैदा जेम्स नाबाद 15 धावांवर राहिली.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

दक्षिण आफ्रिका महिला (प्लेइंग इलेव्हन): लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), तझमिन ब्रिट्स, मारिजाने कॅप, ॲनेके बॉश, सुने लुस, क्लो ट्रायॉन, नादिन डी क्लर्क, ॲनेरी डेर्कसेन, सिनालो जाफ्ता (विकेटकीपर), नॉनकुलुलेको म्लाबा, अयाबोंगा खाका.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.