AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Womens T20 World Cup : दक्षिण अफ्रिकेची अंतिम फेरीत धडक, ऑस्ट्रेलियाचा हिशेब केला चुकता

वुमन्स टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेत बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पराभूत करत दक्षिण अफ्रिकेने अंतिम फेरीत धडक मारली आहे. ऑस्ट्रेलियाने दक्षिण अफ्रिकेसमोर विजयासाठी 135 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान दक्षिण अफ्रिकेने 1 गडी गमवून पूर्ण केलं. तसेच या स्पर्धेतील मोठी उलटफेर करत अंतिम सलग दुसऱ्यांदा एन्ट्री मारली आहे.

Womens T20 World Cup : दक्षिण अफ्रिकेची अंतिम फेरीत धडक, ऑस्ट्रेलियाचा हिशेब केला चुकता
Image Credit source: Twitter
| Updated on: Oct 17, 2024 | 10:23 PM
Share

वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील बलाढ्य ऑस्ट्रेलियाचं आव्हान दक्षिण अफ्रिकेने मोडून काढलं आहे. मागच्या पर्वात अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने दक्षिण अफ्रिकेचा पराभव केला होता. त्या पराभवाचा वचपा काढण्यात दक्षिण अफ्रिकेला यश आलं आहे. ऑस्ट्रेलियाने साखळी फेरीत चार पैकी चार सामने जिंकत उपांत्य फेरी गाठली होती. मात्र ऑस्ट्रेलियाचा विजयरथ बाद फेरीत दक्षिण अफ्रिकेने रोखला. त्यामुळे सातव्यांदा जेतेपदाचं ऑस्ट्रेलियाचं स्वप्न भंगलं आहे. आता न्यूझीलंड वेस्ट इंडिज यांच्यात दुसरा उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. या सामन्यातील विजेत्या संघाशी अंतिम फेरीत दक्षिण अफ्रिका लढणार आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने 20 षटकात 5 गडी गमवून 134 धावा केल्या आणि विजयासाठी 135 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान दक्षिण अफ्रिकेने 17.2 षटकात 2 गडी गमवून पूर्ण केलं.

या धावांचा पाठलाग करताना लॉरा वॉल्ववॉर्ड्ट आणि तझमीन ब्रिट्स जोडीने सावध सुरुवात केली. पहिल्या विकेटसाठी 25 धावा जोडल्या. पण एनाबेल सुथरलँडच्या गोलंदाजीवर तझमीन ब्रिट्सचा त्रिफळा उडला आणि 15 धावांवर डाव आटोपला. पण त्यानंतर आलेल्या अनेके बॉशने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची धुलाई केली. अनेके बॉशने 31 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. ही जोडी लवकर फोडण्यात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना अपयश आलं. लॉराने 37 चेंडूत 42 धावा केल्या आणि बाद झाली. तिथपर्यंत सामना विजयी दृष्टीक्षेपात आला होता. दुसऱ्या विकेटसाठी दोघांनी 96 धावांची भागीदारी केली. अनेके बॉशने 48 चेंडूत नाबाद 74 धावांची खेळी केली. या खेळीत तिने 8 चौकार आणि 1 षटकार मारला.

ऑस्ट्रेलियाचा डाव

ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या षटकात धक्का बसला. ग्रेस हॅरिस 3 धावांवर असताना बाद झाली. त्यानंतर जॉर्जिया वारेहमही काही खास करू शकली नाही. 5 धावा करून तंबूत परतली. त्यानंतर बेथ मूनी आणि तहिला मॅकग्राथ या जोडीने डाव सावरला. दोघांनी मिळून 50 धावांची भागीदारी केली. तहिला 27 धावा करून बाद झाली. त्यानंतर एलिसा पेरी ही बेथ मूनीच्या जोडीला आली. तिने आक्रमक खेळी केली. 23 चेंडूत 2 चौकार मारत 31 धावा केल्या. तर बेथ मूनी 44 धावा करून बाद झाली. तर तीन चौकारांसाह फोइबे लिचफिल्डने 9 चेंडूत 16 धावा केल्या.

निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?
निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?.
बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी
बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी.
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर.
भाजपला मोठा धक्का, फुलंब्रीमध्ये उद्धव ठाकरे यांची सेना आघाडीवर
भाजपला मोठा धक्का, फुलंब्रीमध्ये उद्धव ठाकरे यांची सेना आघाडीवर.
साताऱ्यातील मतमोजणीत दोन्ही राजेंना धक्का तर 3 अपक्ष आघाडीवर
साताऱ्यातील मतमोजणीत दोन्ही राजेंना धक्का तर 3 अपक्ष आघाडीवर.
मतमोजणीत महायुती आघाडीवर, भाजप नंबर 1, 100 चा आकडा पार
मतमोजणीत महायुती आघाडीवर, भाजप नंबर 1, 100 चा आकडा पार.
बारामतीत अजित पवार vs शरद पवार संघर्ष, दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला
बारामतीत अजित पवार vs शरद पवार संघर्ष, दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला.
राजगुरुनगरमध्ये वळसे-पाटील अन् अमोल कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला
राजगुरुनगरमध्ये वळसे-पाटील अन् अमोल कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला.
कणकवलीत राणे बंधूंमध्ये चुरस, कोण मारणार बाजी? निकालाची प्रतीक्षा
कणकवलीत राणे बंधूंमध्ये चुरस, कोण मारणार बाजी? निकालाची प्रतीक्षा.
नादच खुळा...निकालाआधी कोल्हापुरात विजयाचे बॅनर, कागलमध्ये कुणाची चर्चा
नादच खुळा...निकालाआधी कोल्हापुरात विजयाचे बॅनर, कागलमध्ये कुणाची चर्चा.