VIDEO : लास्ट ओव्हरमध्ये 18 धावांची गरज, 4,1,4,4, वेस्ट इंडिज-पाकिस्तान सामन्यातील थरार
PAK vs WI T20 WC : क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. लास्ट ओव्हरमध्ये काय निकाल लागेल? हे कोणीच ठामपणे सांगू शकत नाही. कधी बॅटिंग करणारी टीम तर कधी बॉलिंग करणारी टीम जिंकते.
PAK vs WI T20 WC : सध्या दक्षिण आफ्रिकेत ICC महिला T20 वर्ल्ड कपची धूम आहे. या स्पर्धेत एकापेक्षाएक रोमांचक सामने पहायला मिळतायत. या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजची टीम आमने-सामने होती. लास्ट ओव्हरपर्यंत खेचला गेलेला हा सामना खूपच रोमांचक ठरला. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. लास्ट ओव्हरमध्ये काय निकाल लागेल? हे कोणीच ठामपणे सांगू शकत नाही. कधी बॅटिंग करणारी टीम तर कधी बॉलिंग करणारी टीम जिंकते. तुम्ही कितीही आक्रमक क्रिकेट खेळलात तरी, सामना पालटण्यासाठी एक चेंडूही पुरेसा ठरतो. वेस्ट इंडिज विरुद्ध पाकिस्तान सामन्यात हेच घडलं. पाकिस्तानची टीम जिंकणारी मॅच हरली.
पाकिस्तानला हव्या होत्या 18 धावा
वेस्ट इंडिज विरुद्ध पाकिस्तानचा विजय निश्चित दिसत होता. लास्ट ओव्हरमध्ये पाकिस्तानला विजयासाठी 18 धावांची आवश्यकता होती. महत्त्वाच म्हणजे पाकिस्तानचे 6 विकेट बाकी होते. त्यांच्याकडे धोका पत्करण्याच पूर्ण स्वातंत्र्य होतं. दमदार अंदाजामध्ये पाकिस्तानच्या टीमने ओव्हरची सुरुवात केली.
अशी झाली लास्ट ओव्हरची सुरुवात
पहिल्या चेंडूवर 4 रन्स, दुसऱ्या बॉलवर 1 रन्स, तिसऱ्या चेंडूवर 4 रन्स पहिल्या 3 चेंडूत पाकिस्तानने 9 धावा केल्या. म्हणजे अखेरच्या 3 चेंडूंवर पाकिस्तानला विजयासाठी 9 धावांची आवश्यकता होती. त्यांच्याकडे 6 विकेट बाकी होते. पाकिस्तानचा विजयाचा इरादा पक्का होता.
तिथेच गेम झाला टर्न
चौथ्या चेंडूवर पाकिस्तानी बॅट्समनने पुन्हा चौकार मारला. रोमांच टिपेला पोहोचला होता. पाकिस्तानचा विजय निश्चित वाटत होता. सर्वकाही पाकिस्तानच्या फेव्हरमध्ये दिसत होतं. त्याचवेळी गेम टर्न झाला. पुढच्या 5 व्या चेंडूवर पाकिस्तानचा विकेट गेला. पाकिस्तानची सामन्यातील ही पाचवी विकेट होती. या विकेटने वेस्ट इंडिजला संजीवनी मिळवून दिली.
शेवटच्या चेंडूवर सिक्सची गरज
शेवटच्या चेंडूवर पाकिस्तानला विजयासाठी 5 धावांची गरज होती. विजयासाठी एक सिक्स पुरेसा होता. मॅच रोमांचक वळणावर होती. कॉमेंट्री बॉक्सपासून मैदानावर उपस्थित असलेल्या प्रेक्षकांमध्ये सामन्याच्या निकालाबद्दल उत्सुक्ता दिसत होती. फक्त 3 रन्सनी पराभव
शेवटचा चेंडू पाकिस्तानी बॅट्समनच्या पॅडवर लागला. 1 धाव मिळाली. अशा प्रकारे पाकिस्तानच्या टीमचा 3 रन्सनी पराभव झाला. पाकिस्तानी कॉमेंटेटरच्या चेहऱ्यावर या पराभवाचा परिणाम स्पष्टपणे दिसून आला. पहिली बॅटिंग करताना वेस्ट इंडिजच्या टीमने 6 बाद 116 धावा केल्या. पाकिस्तानी टीमने 5 बाद 113 धावा केल्या.