IND vs NZ : वानखेडे स्टेडियमकडे येणारे सर्व रस्ते बंद, पोलिसांचा मोठा निर्णय; भारत – न्यूझीलंड सामन्याआधीच टेन्शन वाढलं

IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड सामना पाहायला जाणाऱ्या प्रेक्षकांसाठी मोठी महत्त्वाची बातमी आहे. पोलिसांनी वानखेडे स्टेडियमकडे जाणारे रस्ते बंद केले आहेत. त्यामुळे चााहत्यांना टेन्शन आलं. रस्ते का बंद केलेत हे जाणून घ्या.

IND vs NZ : वानखेडे स्टेडियमकडे येणारे सर्व रस्ते बंद, पोलिसांचा मोठा निर्णय; भारत - न्यूझीलंड सामन्याआधीच टेन्शन वाढलं
Follow us
| Updated on: Nov 15, 2023 | 1:21 PM

मुंबई : वर्ल्ड कप 2023 मधील पहिला सेमी फायनल सामना भारत आणि न्यूझीलंडमध्ये पार पडणार आहे. या सामन्याला काही तासांचा अवधी बाकी असताना मुंबई पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. मरिन ड्राईव्हच्या शेजारीच असलेल्या वानखेडे स्टेडियमकडे जाणारे सर्व रस्ते पोलिसांकडून बंद करण्यात आले आहेत. पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून स्टेडियमच्या बाहेरील बंदोबस्त आणखी वाढवला आहे. वानखेडे स्टेडियममध्ये जाणाऱ्या प्रेक्षकांना पोलिसांनी थांबवून घेतलं आहे. स्टेडिअमला जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे.

वानखेडे स्टेडियम च्या परिसरातील सर्व बंद आणि बाहेर रस्त्यावर उभी असलेली वाहन तपासून वाहतूक पोलिसांकडून उचलण्यात आली आहे. पोलीस प्रत्येकाची चौकशी करून त्याचं तिकिट पाहून स्टेडियममध्ये त्याला तिकीट तपासून पाठवत आहेत. आजच्या सामन्यासाठी पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला असून सात पोलीस उपायुक्त तसेच 200 अधिकारी आणि 500 पोलीस कर्मचारी तैनात असणार आहेत.

पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून वानखेडे स्टेडियमच्या सर्व गेटसमोर वाहने लावण्यास मनाई केली आहे. ज्वलनशील पदार्थ, आक्षेपार्ह्य वस्तू, तंबाखूजन्य पदार्थ  आणि इ. गोष्टींवर बंदी घातली असून चाहत्यांना आतमध्ये नेता येणार नाही.

वर्ल्ड कप साठी टीम इंडियाचा संघ: रोहित शर्मा (C), विराट कोहली, जसप्रीत बुमराह, शुभमन गिल, केएल राहुल, प्रसिद्ध कृष्णा , श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, मोहम्मद . सिराज, मो. शमी, अक्षर पटेल आणि शार्दुल ठाकूर.

वर्ल्ड कप साठी न्यूझीलंडचा संघ: केन विल्यमसन (C), ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साउथी, विल यंग.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.