AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SA vs BAN : दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशला 149 धावांनी नमवलं, उपांत्य फेरीच्या दिशेने कूच

World Cup 2023, SA vs BAN : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत दक्षिण अफ्रिकेने बांगलादेशचा 149 धावांनी धुव्वा उडवला. बांगलादेशचा चौथा पराभव असल्याने स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे. तर दक्षिण अफ्रिकेने उपांत्य फेरीच्या दिशेने कूच केला.

SA vs BAN : दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशला 149 धावांनी नमवलं, उपांत्य फेरीच्या दिशेने कूच
| Updated on: Oct 24, 2023 | 10:08 PM
Share

मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील 23 वा सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश यांच्यात रंगला. हा सामना दक्षिण आफ्रिकेने धावांनी जिंकला. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण अफ्रिकेने 50 षटकात 5 गडी गमवून 382 धावा केल्या. विजयासाठी 383 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठताना बांगलादेशचा डाव गडगडला. बांगलादेशला षटकात 233 धावा करता आल्या. महमुदुल्लाह सोडता एकही फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही. तर क्विंटन डीकॉक याने स्पर्धेतील तिसरं शतक ठोकलं आहे. दक्षिण अफ्रिकेने बांगलादेशला मोठ्या फरकाने पराभूत केल्याने नेट रनरेटमध्ये फायदा झाला. यामुळे गुणतालिकेत थेट दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.

दक्षिण अफ्रिकेचा डाव

दक्षिण अफ्रिकेच्या डावाची सुरुवात अडखळत झाली. संघाच्या 36 धावा असताना रीझा हेन्ड्रिक आणि रस्सी वॅन देर डुसेने स्वस्तात बाद झाले. त्यानंतर क्विंटन डीकॉक आणि एडन मार्करम यांनी डाव सारवला. त्यानंतर हेन्रिक क्लासेन याने जबरदस्त खेळी करत संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. क्विंटन डीकॉक याने 140 चेंडूत 174 धावा केल्या. यात 15 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश आहे. तसेच मार्करमने 69 चेंडूत 60 धावा आणि हेन्रिक क्लासेननं 49 चेंडूत 90 धावा केल्या. बांगलादेशकडून हसन महमुदने 2, मेहदी हसन 1, शोरीफुल इस्लाम 1 आणि शाकिब अल हसनने 1 गडी बाद केला.

बांगलादेशचा डाव

दक्षिण अफ्रिकेने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघाची घसरण सुरु झाली. महमुदुल्ला हा एक फलंदाज सोडला तर दुसरं कोणीही चांगली कामगिरी करू शकला नाही. दक्षिण अफ्रिकेकडून मार्को जानसेननं 2, गेराल्ड कोएत्झी याने 3, लिजाद विल्यिम्स 2, कागिसो रबाडा 2 आणि केशव महाराज याने 1 गडी बाद केला.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, कागिसो रबाडा, लिझाद विल्यम्स.

बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन): तनझिद हसन, लिटन दास, नजमुल हुसेन शांतो, शकीब अल हसन (कर्णधार), मेहदी हसन मिराझ, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), महमुदुल्लाह, नसुम अहमद, मुस्तफिजुर रहमान, शोरीफुल इस्लाम, हसन महमूद.

भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.