World Cup 2023 | टीम इंडियाला वर्ल्ड कप आधी मोठा झटका
टीम इंडियाला आगामी वनडे वर्ल्ड कपआधी एक वाईट बातमी समोर आली आहे. टीम इंडियाला तोटा झाला आहे. जाणून घ्या काय झालं?
मुंबई | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 चं यजमानपद भारताला मिळालं आहे. भारतात 2011 नंतर पहिल्यांदाच आयसीसी स्पर्धेच्या आयोजनाचा मान मिळालेला आहे. या स्पर्धेचं आयोजन हे ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान करण्यात होणार आहे. बांगलादेश विरुद्ध आयर्लंड यांच्यातील 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका पार पडली आहे. यासह वर्ल्ड कप सुपर लीग स्पर्धेचा शेवट झाला. या वर्ल्ड कप सुपल लीग फेरीनंतर टीम इंडियाला मोठा झटका लागला आहे. टीम इंडियाने वर्ल्ड कपसाठी क्वालिफाय केलं आहे. मात्र यानंतरही टीम इंडियाला मोठा फटका बसला आहे.
टीम इंडियाला एका टीमने मागे टाकलं आहे. बांगलादेशने आयर्लंडवर तिसऱ्या वनडेमध्ये 4 धावांनी विजय मिळवला. बांगलादेशने या विजयासह 3 सामन्यांची मालिका 2-0 ने जिंकली. या विजयासह बांगलादेशने टीम इंडियाला पॉइंट्स टेबलमध्ये पछाडलं. बांगलादेश वर्ल्ड कप सुपर लीग स्पर्धेतील पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर पोहचली. तर टीम इंडियाची चौथ्या क्रमांकावर घसरण झाली. थोडक्यात काय तर बांगलादेश टीम इंडियाच्या पुढे निघाली.
आगामी वर्ल्ड कपसाठी एकूण 8 संघाना थेट एन्ट्री मिळाली आहे. यामध्ये टीम इंडियासह न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेचा समावेश आहे. या वर्ल्ड कपमध्ये एकूण 10 संघ सहभागी होणार आहे. तर 2 संघ अजूनही ठरलेले नाहीत.
या वर्ल्ड कप क्वालिफायर फेरीतून उर्वरित 2 संघ ठरणार आहेत. या 2 जागांसाठी विंडिज, श्रीलंका, आयर्लंड, झिंबाब्वे, नेदरलँड, नेपाळ, ओमान, स्कॉटलंड, यूएई आणि यूएसए 10 संघांमध्ये कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. या क्लालिफायर राउंडला येत्या 18 जूनपासून सुरुवात होणार आहे.
दरम्यान या वर्ल्ड कप क्वालिफायरसाठी वेस्टइंडिज टीमने आपला संघ जाहीर केला आहे. तसंच विंडिज क्रिकेट बोर्डाने डॅरेन सॅमी याची वनडे आणि टी 20 फॉर्मेटसाठी कोच म्हणून नियुक्ती केली आहे. डॅरेन सॅमी याने आपल्या नेतृत्वात विंडिज टीमला 2 वेळा टी 20 वर्ल्ड कप जिंकून दिला होता. त्यामुळे आता सॅमीवर विंडिजला वर्ल्ड कपसाठी क्वालिफाय करुन देण्याची जबाबदारी असणार आहे.
यूएई विरुद्धच्या वनडे सीरिजसाठी विंडिज टीम | शाई होप (कॅप्टन), ब्रँडन किंग (उपकर्णधार), एलिक अथानाजे, शमरह ब्रूक्स, यानिक कारिया, कीसी कार्टी, रोस्टन चेज, डोमिनिक ड्रेक्स, केवम हॉज, अकीम जॉर्डन, गुडाकेश मोती, कीमो पॉल, रेमन रीफर, ओडियन स्मिथ आणि डेवोन थॉमस.