भारताने कसोटी मालिका गमावल्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत वर खाली, अंतिम फेरीचं गणित आता..

भारताचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेचं सर्व गणित आता फिस्कटलं आहे. न्यूझीलंडविरुद्ध सहज जिंकण्याची भाषा करणाऱ्या टीम इंडियाचं पानिपत झालं आहे. न्यूझीलंडने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 ने पराभूत केलं आहे. मात्र भारताला आता अंतिम फेरीसाठी कठीण परीक्षा द्यावी लागणार आहे.

भारताने कसोटी मालिका गमावल्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत वर खाली, अंतिम फेरीचं गणित आता..
Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Oct 26, 2024 | 4:15 PM

न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचं पानिपत झालं आहे. ही मालिका भारत सहज खिशात घालेल असं वाटत होतं. पण झालं अगदी त्याचा उलट.. न्यूझीलंडने भारताला कसोटी मालिकेत 2-0 ने नमवलं आहे. पहिल्या कसोटी सामन्यानंतर टीम इंडिया कमबॅक करेल असं वाटत होतं. पण कसलं काय? उलट दुसऱ्या कसोटी सामन्यात आणखी खराब हाल झाले. खरं तर कर्णधार रोहित शर्मा फलंदाजीत फेल गेला आहे. विराट कोहलीला कसोटीत वातावरण जुळवून घेण्यास कठीण गेल्याचं दिसत आहे. त्यामुळे केएल राहुलला बसवून काय फायदा झाल्याचं दिसत नाही. उलट टीम इंडियाची परिस्थिती आणखी नाजूक झाली. पहिल्या डावातच भारताचा पराभव निश्चित झाला होता. पहिल्या डावात न्यूझीलंडने 259 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना भारताचा संपूर्ण संघ 156 धावांवर तंबूत परतला. कागदावर मोठी धावसंख्या असलेले खेळाडू सपशेल फेल ठरले. त्यामुळे न्यूझीलंडकडे 103 धावांची आघाडी आणि दुसऱ्या डावात 255 धावा केल्या. त्यामुळे विजयासाठी 358 धावांचं आव्हान मिळालं होतं. पण भारतीय संघ 245 धावा करू शकला आणि 113 धावांनी पराभूत व्हावं लागलं. यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेवर फरक पडला आहे.

दुसऱ्या कसोटी सामन्यात पराभव होण्यापूर्वी भारताची विजयी टक्केवारी ही 68.06 इतकी होती. आता त्यात घसरण झाली असून विजयी टक्केवारी 62.80 वर आली आहे. त्यामुळे आता पुढचं सर्व गणित कठीण झालं आहे. भारताला अजून 6 कसोटी सामने खेळायचे आहेत. जर तरच्या गणितात पडायचं नसेल तर काहीही करून 4 सामने जिंकावे लागतील. पण काही गडबड झाली तर श्रीलंका, न्यूझीलंड आणि दक्षिण अफ्रिकेच्या कामगिरीवर अवलंबून राहावं लागेल.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारत अजूनही अव्वल स्थानी आहे. तर ऑस्ट्रेलिया 62.50 विजयी टक्केवारीसह दुसऱ्या, श्रीलंका 55.56 विजयी टक्केवारीसह तिसऱ्या, न्यूझीलंड 50 विजयी टक्केवारीसह चौथ्या, दक्षिण अफ्रिका 47.62 विजयी टक्केवारीसह पाचव्या, इंग्लंड 40.79 विजयी टक्केवारीसह सहाव्या, पाकिस्तान 33.33 विजयी टक्केवारीसह सातव्या, बांग्लादेश 30.56 विजयी टक्केवारीसह आठव्या, तर वेस्ट इंडिज 18.52 विजयी टक्केवारीसह सर्वात शेवटच्या स्थानावर आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.