World Test Championship Final 2021 | टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामना ड्रॉ किंवा टाय झाल्यास ट्रॉफी कुणाला?

टीम इंडिया (Team India) विरुद्ध न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमधील अंतिम (World Test Championship Final 2021) सामना 18-22 जूनदरम्यान साऊथम्पटनमध्ये खेळवण्यात येणार आहे.

World Test Championship Final 2021 | टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामना ड्रॉ किंवा टाय झाल्यास ट्रॉफी कुणाला?
Virat Kohli and Kane Williamson
Follow us
| Updated on: May 14, 2021 | 12:08 AM

साऊदम्पटन : टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमधील अंतिम (World Test Championship) सामना खेळवण्यात येणार आहे. हा सामना साऊथम्पटनमध्ये 18-22 जून दरम्यान खेळवण्यात येणार आहे. दोन्ही संघ या निर्णायक सामन्यासाठी सज्ज आहेत. सलग 2 वर्ष चाललेल्या या स्पर्धेतून न्यूझीलंड आणि भारताने अंतिम सामन्यात धडक मारली. टीम इंडियाने या दरम्यान 6 कसोटी मालिकांमधील 12 सामन्यात विजय मिळवला. 4 वेळा पराभवाचा सामना करावा लागला. तर एक सामना अनिर्णित राहिला. यासह विराटसेना 520 गुणांसह क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर होती. तर न्यूझीलंडचा 5 सीरिजमधील 7 सामन्यात विजय झाला. तर 4 सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला. यासह न्यूझीलंडचे एकूण 420 पॉइंट्स होते. कोरोनामुळे न्यूझीलंडला एक कसोटी मालिका खेळता आली नाही. (World Test Championship Final 2021 Who won the trophy after the final match between Team India and New Zealand was drawn or tied)

आयसीसीने कसोटी क्रिकेटमध्येही रोमांच निर्माण करण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. मात्र या स्पर्धेला कोरोनाचा फटका बसला. यामुळे काही मालिका रद्द तर स्थगित कराव्या लागल्या. मात्र अखेरीस सर्व संकटांवर मात करत ही स्पर्धा अखेर अंतिम टप्प्यात पोहचली आहे.

सामना अनिर्णित किंवा टाय झाल्यास विजेता कोण?

या स्पर्धेदरम्यान आतापर्यंत अनेक समस्या उद्भवल्या. अनेक वेळा नैसर्गिक कारणामुळे सामना काही वेळेसाठी किंवा दिवसांसाठी स्थगित करावा लागतो. त्यामुळे काही ओव्हर्सचा खेळ होऊ शकत नाही. दरम्यान असं काही या सामन्यादरम्यान झालं अन सामना अनिर्णित किंवा टाय झाल्यास विजेता कोण ठरणार, असा प्रश्न अनेक क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. याबाबत आपण जाणून घेणार आहोत.

आयसीसीने अद्याप याबाबत काही ठरवलेलं नाही. याचाच अर्थ असा की सामना अनिर्णित किंवा टाय झाल्यास दोन्ही संघ संयुक्तरित्या विजेते ठरतील. या सामन्याच्या पार्श्वभूमीवर आयसीसीने एक दिवस राखीव ठेवला आहे. सामन्यादरम्यान विविध कारणांमुळे व्यत्यय येतो. त्यामुळे काही वेळ खेळ होत नाही. कधी पावसामुळे तसेच विविध कारणांमुळे काही वेळ सामना थांबवावा लागतो. साधारणपणे एक कसोटी खेळवण्यासाठी 30 तासांचा खेळ अपेक्षित असतो. तर हाच वेळ दिवसाकाठी 6 तास इतका असतो. या 6 तासांमध्ये चहापान, लंच आणि ड्रींक्स ब्रेकचा समावेश नसतो.

असा होणार राखीव दिवसाचा उपयोग

विशेष म्हणजे या दिवसाचा उपयोग हा सामना निकाली काढण्यासाठी करता येणार नाही. या दिवसाचा उपयोग केवळ व्यर्थ गेलेल्या तासांच्या खेळाची भरपाई करण्यासाठी करता येणार आहे. 23 जून हा राखीव दिवस असणार आहे.

दरम्यान हा सामना अनिर्णित किंवा टाय झाल्यास दोन्ही संघांना संयुक्तरित्या विजेता घोषित केल्यास, या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेला काहीच अर्थ राहणार नाही. वर्ल्ड कप 2019 चा अंतिम सामना टाय झाला होता. त्यामुळे सर्वाधिक चौकार मारलेल्या संघाला विजयी घोषित करण्यात आले होते. या विचित्र नियमामुळे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती.

संबंधित बातम्या :

ICC Test Ranking | टीम इंडियाची सलग 5 वर्ष बादशाहत कायम, आयसीसीच्या वार्षिक क्रमवारीत विराट सेना अव्वलस्थानी

WTC फायनलमध्ये भारत-न्यूझीलंड आमनेसामने, इंग्लंडच्या दिग्गजाला सहनच होईना, म्हणाला, माझा पॉईंट टेबलवरच आक्षेप!

(World Test Championship Final 2021 Who won the trophy after the final match between Team India and New Zealand was drawn or tied)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.