Video : बारकं पोरगंही सांगेल OUT की NOT OUT, क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वाईट डीआरएस!

क्रिकेटमध्ये डीआरएसचा निर्णय आल्यापासून अनेक सामन्यांचे निकाल आपण बदलेले पाहिले आहेत. मात्र हा क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वाईट डीआरएस पाहिलात का? नसेल तर पाहून घ्या.

Video : बारकं पोरगंही सांगेल OUT की NOT OUT, क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वाईट डीआरएस!
Follow us
| Updated on: Mar 03, 2023 | 10:13 PM

मुंबई : क्रिकेटमध्ये डीआरएसचा निर्णय आल्यापासून अनेक सामन्यांचे निकाल आपण बदलेले पाहिले आहेत. काहीवेळा अंपायरच्या चुकीच्या निर्णयामुळे अनेक संंघाचा हातातोंडाशी आलेला विजय विरोधी संघाच्या पारड्यात गेला आहे. डीआरएस आल्यापासून अंपायरला त्यांनी दिलेले निर्णय बदलताना आपण पाहिलं आहे. मात्र काही सामन्यांमध्ये खेळाडू आऊट झाल्यावरही डीआरएसचा वापर करताना दिसले आहेत. मात्र अशातच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये कर्णधाराने घेतलेला डीआरएसवरून त्याला ट्रोल करण्यात येत आहे. इतकंच नाहीतर हा क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वाईट डीआरएस म्हटला जात आहे.

नेमकं काय झालं?

बांगलादेश आणि इंग्लंड यांच्यामध्ये तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा सामना शेर बांगला स्टेडिअमवर सुरू होता. सामन्याच्या 48 ओव्हरमध्ये तस्किन अहमदने एक शानदार यॉर्कर टाकला, ज्यावर स्ट्राईकला असलेल्या आदिल रशीदला मोठा फटका मारता आला नाही. बॉल बॅटच्या मधोमध लागला होता आणि पॅडच्या जवळही गेला नव्हता. तरीही बांगलादेशी संघाचा कर्णधार तमीम इक्बालने लगेच रिव्ह्यू घेण्याचा निर्णय घेतला.

डीआरएसचा घेतल्यावर स्पष्टपणे दिसत आहे की बॉल बॅटला लागला होता. कुठेही शंका येण्याचं कोणताही अँगल नव्हता ना कारण होतं. जेणेकरून रिव्ह्यू घेण्याची गरज होती. तिसऱ्या पंचांनी त्यांचा निर्णय कायम ठेवला. यावरून आदिलही हसताना दिसला. त्यानंतर बांगलादेशच्या कर्णधाराला नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर खूप ट्रोल केलं आहे.

दरम्यान, या सामन्याबद्दल बोलायचे झालं तर प्रथम फलंदाजी करताना इंग्लंड संघाने 50 षटकात 7 गडी गमावून 326 धावा केल्या. यादरम्यान जेसन रॉयने 124 चेंडूत 132 धावा केल्या. कर्णधार जॉस बटलरनेही धडाकेबाज खेळी केली. यामध्ये त्याने 64 चेंडूत 76 धावा केल्या. तर मोईन अली 35 चेंडूत 42 धावा करून बाद झाला. सॅम करननेही 19 चेंडूत 33 धावांची खेळी खेळली.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.