Team India : ऑस्ट्रेलियाने मजबूत फोडला, क्रिकेटच्या इतिहासात सर्वात वाईट कामगिरी करणारा पहिला भारतीय बॉलर
Worst Record in Indian Cricket History : ऑस्ट्रेलिया आणि भारतामध्ये झालेल्या तिसऱ्य टी-20 सामन्यात ग्लेन मॅक्सवेलने चौकार मारत विजयावर शिक्कामोर्तब केलं. पण या सामन्यात एका भारतीय गोसलंदाजाच्या नावावर भयानक विक्रम झाला आहे.
मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलियामधील तिसऱ्या टी-20 सामन्यामध्ये कांगारूंनी विजय मिळवला. या विजयासह कांगारूंनी मालिका गमावण्याचं संकट टाळलं आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने 222-3 धावांचा डोंगर उभारला होता. मात्र ग्लेन मॅक्सवेल याच्या शतकी खेळीसमोर भारतीय गोलंदाजांनी गुडघे टेकले. ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलने चौकार मारत विजयावर शिक्कामोर्तब केलं. पण या सामन्यात एका भारतीय गोसलंदाजाच्या नावावर भयानक विक्रम झाला आहे.
कोण आहे तो खेळाडू?
हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून प्रसिद्ध कृष्णा आहे. प्रसिद्धच्या नावावर क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात खराब विक्रमाची नोंद झाली आहे. टी-20 क्रिकेट फॉरमॅटमध्ये भारताकडून अशी कामगिरी करणारा भारताचा तो पहिला गोलंदाज ठरला आहे.
नेमका काय आहे तो खराब विक्रम?
तिसऱ्या टी-20 साामन्यामध्ये प्रसिद्ध कृष्णा खास लयीत दिसला नाही. मात्र .याच भारतीय संघाला जोरदार फटका बसला. चार ओव्हरमध्ये कृष्णाने तब्बल 68 धावा दिल्या. टी-20 क्रिकेटमध्ये इतक्या धावा देणारा तो पहिला गोलंदाज ठरला आहे. युजवेंद्र चहलच्या नावावर आधी ही खराब रेकॉरर्ड होता. 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध त्याने 64 धावा दिल्या होत्या.
युझवेंद्र चहल- 64 धावा अर्शदीप सिंग- 62 धावा जोगिंदर शर्मा- 57 धावा दीपक चहर- 56 धावा
प्रसिद्ध कृष्णाची कारकिर्द
दरम्यान, प्रसिद्ध कृष्णा याने आयर्लंडविरूद्धच्या टी-२० मालिकेध्ये पदार्पण केलं होतं. या मालिकेमध्ये जसप्रीत बुमराहकडे कॅप्टन्सी देण्यात आली होती.आतापर्यंत प्रसिद्धने 29 वनडे आणि 5 टी-सामने खेळत एकूण 8 विकेट घेतल्यात.
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, अॅरॉन हार्डी, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (w/c), नॅथन एलिस, जेसन बेहरेनडॉर्फ, तन्वीर संघा, केन रिचर्डसन
भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, रुतुराज गायकवाड, इशान किशन, सूर्यकुमार यादव (C), रिंकू सिंग, टिळक वर्मा, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, आवेश खान, प्रसिद्धा कृष्णा