वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठणं भारतासाठी कठीण! झालं असं की…

भारताने टी20 वर्ल्डकप जिंकल्यापासून चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम सामन्याचे वेध लागले आहेत. चॅम्पियन ट्रॉफी पाकिस्तानात होणार असल्याने अजूनतरी साशंकता आहे. तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचंही काही खरं नाही. त्यामुळे भारतीय क्रीडारसिकांना चिंता लागून राहिली आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठणं भारतासाठी कठीण! झालं असं की...
Follow us
| Updated on: Aug 06, 2024 | 4:40 PM

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-2025 या वर्षाच्या गुणतालिकेत भारतीय संघ अव्वल स्थानी आहे. त्यामुळे भारतीय संघ तिसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरी गाठणार अशी क्रीडाप्रेमींना आस आहे. भारतीय संघाला अंतिम सामना गाठण्यासाठी तीन मालिका पार पडाव्या लागणार आहेत. या तीन पैकी दोन मालिकांमध्ये भारताने विजय मिळवला की अंतिम फेरीचं तिकीट पक्कं होणार आहे. पण भारताच्या या स्वप्नावर विरजन पडू शकतं. त्याचं कारण म्हणजे बांगलादेशमध्ये उद्भवलेली तणावपूर्ण स्थिती…भारतीय संघ पुढील तीन कसोटी मालिकांमध्ये बांग्लादेश, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियासोबत खेळणार आहे. भारतीय संघ बांग्लादेशसोबत दोन सामन्यांची, न्यूझीलंडसोबत तीन सामन्यांची, तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. न्यूझीलंड आणि बांग्लादेश हे संघ भारतात येणार आहेत. पण बांगलादेशमधील स्थिती पाहता संघ भारतात येईल की नाही याबाबत साशंकता आहे. सद्यस्थिती पाहता, बांगलादेशमध्ये आयोजित केलेला आयसीसी महिला टी20 वर्ल्डकप स्थगित करण्याची वेळ आली आहे. अशा स्थितीत बांग्लादेश संघ भारतात येईल की नाही याबाबत शंका आहे.

बांगलादेशची सध्याची स्थिती खूपच वाईट असल्याने पंतप्रधान शेख हसीना यांनी पळ काढला आहे. इतकंच काय तर भारताच्या आश्रयात आल्या आहेत. त्यामुळे तिथली परिस्थिती किती चिघळली आहे याचा अंदाज येतो. त्याचा परिणाम जागतिक पातळीवर होणार यात शंका नाही. दुसरीकडे, त्याचा फटका टीम इंडियाला बसू शकतो. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत जाण्यासाठी बांगलादेशचं सोपं आव्हान होतं. अशात ही मालिकाच झाली नाही, तर भारताचं कठीण होईल. भारत आणि बांग्लादेश यांच्यात पहिला कसोटी सामना 19 ते 23 सप्टेंबर, दुसरा कसोटी सामना 27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर असा असणार आहे.

भारत आणि बांग्लादेश यांच्यातील कसोटी मालिका रद्द करण्याची वेळ आली तर भारताचा न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत कस लागेल. इतकंच काय तर गणित चुकलं तर अंतिम फेरीच्या आशा देखील मावळतील. त्यात भारतीय संघ पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियात जाणार आहे. भारताची ऑस्ट्रेलियातील कामगिरी तितकी काही चांगली नाही. जर भारताचं गणित चुकलं तर न्यूझीलंड आणि श्रीलंकेला संधी मिळू शकते.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.