RCB vs UPW : 11 SIX, 45 फोर, 122 चेंडूत ट्रिपल सेंच्युरी, आता आजारातून उठून RCB साठी बनली मॅच विनर
RCB vs UPW WPL 2023 : टीमसाठी ती बनली संकटमोचक. सोफी डिवाइन, स्मृती मांधना आणि एलिसा पेरीला OUT करुन यूपीला वाटलं मॅच आपलीच. पण कनिका आहुजाने त्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरवलं.
RCB vs UPW WPL 2023 : तिच वय फक्त 20 वर्ष आहे. तुम्ही तिच्या वयावर जाऊ नका. सोफी डिवाइन, स्मृती मांधना आणि एलिसा पेरी सारखे स्टार खेळाडू RCB च्या टीममध्ये आहेत. त्यांना OUT करुन यूपीच्या टीमला वाटलं, आता मॅच आपलीच आहे. पण त्याचवेळी कनिका आहुजाने यूपीच्या अपेक्षांवर पाणी फिरवलं. तिने स्वबळावर मॅच फिरवून RCB ला आवश्यक विजय मिळवून दिला.
पतियाळा येथून येणाऱ्या या 20 वर्षीय मुलीच्या डोळ्यात टीम इंडियाकडून क्रिकेट खेळण्याच स्वप्न आहे. RCB ला विजय मिळवून देऊन तिने पहिली परीक्षा पास केलीय. ही परीक्षा तिच्या मानसिक कणखरतेची होती. धावांच्या वाहत्या गंगेत प्रत्येक फलंदाज आपले हात धुवून घेतो. पण यूपी वॉरियर्स विरुद्धच्या सामन्यात कनिकासमोर मोठ आव्हान होतं. या परीक्षेत ती फुल नंबर्सनी पास झाली.
अडचणीतून RCB ला विजयाच्या दिशेने नेलं
136 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना फक्त 60 धावात RCB च्या 4 विकेट गेल्या होत्या. त्यावेळी कनिका आहुजाने क्रीजवर पाऊल ठेवलं. मॅचमध्ये 11 ओव्हर्सचा खेळ शिल्लक होता. यावेळी कनिकाने कमालीची समज दाखवली. अनुभवाची कमतरता तिने जाणवू दिली नाही. परिस्थितीनुसार, तिने बॅटिंग केली.
कनिकाने किती धावा केल्या?
कनिकाने 30 चेंडूत 8 चौकार आणि एक षटकार मारुन 46 धावा केल्या. ऋचा घोषसोबत पाचव्या विकेटसाठी 60 धावांची भागीदारी केली. त्यामुळे RCB ची टीम बॅकफुटवरुन फ्रंटफुटवर आली. कनिकाला तिच्या या इनिंगसाठी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला.
मॅचआधी आजारी
यूपी विरुद्धच्या सामन्याआधी कनिका आजारी होती. आजारपणातून उठून तिने RCB साठी मॅच विनिंग खेळी केली. वनडेमध्ये तिच्या नावावर ट्रिपल सेंच्युरी
WPL 2023 मध्ये कनिका RCB साठी स्फोटक इनिंग खेळली. पण तिच्यामध्ये यापेक्षा आक्रमक फलंदाजी करण्याची क्षमता आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तिने याचे पुरावे दिले आहेत. पंजाबमध्ये आंतरराज्य वनडे टुर्नामेंट झाली. त्या मॅचमध्ये तिने 122 चेंडूत 305 धावा फटकावल्या होत्या. यात 11 सिक्स आणि 45 फोर होते.