WPL 2023, MI vs RCB | मुंबईचा सलग दुसरा विजय, आरसीबीवर 9 विकेट्सने मात

मुंबई इंडियन्सने वूमन्स प्रीमिअर लीगमधील चौथ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर 9 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला.

WPL 2023, MI vs RCB | मुंबईचा सलग दुसरा विजय, आरसीबीवर 9 विकेट्सने मात
Follow us
| Updated on: Mar 06, 2023 | 11:01 PM

मुंबई | वूमन्स प्रीमिअर लीगमध्ये मुंबई इंडियन्स टीमने सलग दुसरा विजय मिळवला आहे. मुंबईने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर 9 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. आरसीबीने मुंबईला विजयासाठी 156 धावांचं आव्हान दिलं होतं. मुंबईने हे आव्हान 1 विकेटच्या मोबदल्यात 14.2 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. तसेच आरसीबीचा हा या मोसमातील सलग दुसरा पराभव ठरला.

हॅली मॅथ्यूज आणि नॅट ब्रंट या दोघी मुंबईच्या विजयाच्या शिल्पकार ठरल्या. या दोघींनी नाबाद 114 धावांची शतकी विजयी भागीदारी केली. या दरम्यान दोघींनी वैयक्तिक अर्धशतकंही पूर्ण केली. हॅलीने 38 बॉलमध्ये 13 चौकार आणि 1 सिक्सच्या मदतीने झंझावाती 77 धावांची नाबाद खेळी केली. तर नॅटने 29 चेंडूत 9 चौकार आणि 1 षटकारच्या मदतीने नॉट आऊट 55 रन्स केल्या. बंगळुरुकडून प्रीती बोस हीने एकमेव विकेट घेतली.

आरसीबीची बॅटिंग

त्याआधी आरसीबीने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. आरसीबीचा डाव 18.4 ओव्हरमध्ये 155 धावांवर आटोपला. आरसीबीकडून कॅप्टन स्मृती मंधाना आणि श्रेयांका पाटील या दोघींनी प्रत्येकी 23 धावांची खेळी केली. तर मुंबईकडून हॅली मॅथ्यूजने 3 विकेट्स घेतल्या.

हे सुद्धा वाचा

आरसीबीकडून सर्वाधिक रिचा घोष हीने 28 धावा केल्या. स्मृती आणि श्रेयांका या दोघींनी प्रत्येकी 23 धावांचं योगदान दिलं. कनिका आहुजा 22 रन्स करुन माघारी परतली. तर मेगन शूट हीने 20 धावा केल्या. सोफी डिवाइन हीने 16 तर एलिस पॅरीने 13 धावा जोडल्या. आरसीबीच्या फलंदाजांना चांगली सुरुवात मिळाली. मात्र मुंबईच्या गोलंदाजांनी आरसीबीच्या फलंदाजांना हात खोलून दिले नाहीत.

मुंबईच्या हॅली मॅथ्यूजचा अपवाद वगळता साईका इशाक आणि अमेलिया केर या दोघींनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर नॅट ब्रंट आणि पूजा वस्त्राकर या जोडीने 1 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.

मुंबईचा सलग दुसरा विजय

पलटणचा हा या मोसमातील सलग दुसरा विजय ठरला. मुंबईने आरसीबीआधी हंगामातील सलामीच्या सामन्यात गुजरात जायंट्सवर 143 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला होता.

रॉयल चॅलेंजर्स बँगलोर प्लेइंग इलेव्हन | स्मृति मंधना (कॅप्टन), दिशा कसाट, एलिस पॅरी, सोफी डिवाइन, रिचा घोष, हेदर नाइट, श्रेयंका पाटिल, कनिका आहूजा, मेगन शूट, रेणुका सिंह आणि प्रीति बोस

मुंबई इंडियंस प्लेइंग इलेवन | हरमनप्रीत कौर (कर्णधार) यास्तिका भाटिया, हॅली मॅथ्यूज, नॅट ब्रंट, अमेलिया केर, हुमैरा काजी, पूजा वस्त्राकर, इजी वॉन्ग, कालिता आणि सायका.

Non Stop LIVE Update
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.