WPL 2023, MI vs GG | मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्स भिडणार, ‘पलटण’ विजयी ‘पंच’ मारणार?
वूमन्स प्रीमिअर लीग स्पर्धेतील सर्वात यशस्वी असलेल्या मुंबई इंडियन्सचा सामना हा मंगळवारी गुजरात जायंट्स विरुद्ध मुंबईत खेळवणात येणार आहे.
मुंबई | वूमन्स प्रीमिअर लीग स्पर्धेतील 12 वा सामना हा मंगळवारी 14 मार्च रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्स यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी मुंबईतील बेब्रॉन स्टेडियमध्ये पार पडणार आहे.दोन्ही संघ या मोसमात दुसऱ्यांदा भिडणार आहेत. मुंबईने याआधी गुजरातचा पहिल्या सामन्यात पराभव केला होता. त्यामुळे मुंबई परत गुजरातला पराभूत करणार की गुजरात बाजी मारणार याकडे क्रिकेट चाहत्याचं लक्ष असणार आहे.
मुंबई इंडियन्सने या मोसमाच्या सुरुवातीपासून सर्व सामने जिंकले आहेत. मुंबईने आतापर्यंत खेळलेल्या 4 सामन्यात विजय मिळवलाय. त्यामुळे गुजरातसमोर मुंबईचा विजयीरथ रोखण्याचं कडवं आव्हान असणार आहे. मुंबईने स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात गुजरातचा 143 धावांनी धु्व्वा उडवला होता. मुंबईने या विजयासह वर्ल्ड रेकॉर्ड केला होता. वूमन्स टी 20 क्रिकेटमधील सर्वाधिक फरकाने सामना जिंकण्याचा कारनामा मुंबईने केला होता.
त्यामुळे मंगळवारी होणाऱ्या सामन्यात गुजरात जायंट्समोर मुंबईच्या फलंदाजांना रोखण्याचं आव्हान गुजरातसमोर असणार आहे. यात गुजरात किती यशस्वी ठरतं याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.
मुंबई पॉइंट्स टेबलमध्ये टॉपवर
मुंबईने खेळलेल्या 4 सामन्यात विजय मिळललाय. यासह मुंबई पॉइंट्सटेबलमध्ये 8 पॉइंट्ससह पहिल्या स्थानावर आहे. तर मुंबईचा नेट रन रेट हा +3.524 इतका आहे. तर त्या खालोखाल दिल्ली, यूपी, गुजरात आणि शेवटी आरसीबी आहे.
मुंबई इंडियन्स टीम | हरमनप्रीत कौर (कॅप्टन) नेट सीवर, एमिलिया कर, पूजा वस्त्राकर, यास्तिका भाटिया, हीथर ग्राहम, इसाबेल वोंग, अमनजोत कौर, दारा गुजराल, साईका इशाक, हेली मैथ्यूज, क्लोए ट्रायोन, हुमाएरा काजी, प्रियंका बाला, सोनम यादव, नीलम बिश्ट आणि जिंतामनी कलिटा.
टीम गुजरात जायंट्स | बेथ मूनी (कॅप्टन), एश्ले गार्डनर,सोफिया डंकली, एनाबेल सदरलँड, हरलीन देओल, डिएंड्रा डॉटिन, स्नेह राणा, सब्बिनेनी मेघना, जॉर्जिया वारेहम, मानसी जोशी, दयालन हेमलता, मोनिका पटेल, तनुजा कंवर, सुषमा वर्मा, हर्ली गाला, अश्विनी कुमारी, परुनिका सिसोदिया आणि शबनम शकील.