WPL 2023 Purple Cap Winner : धावांची कसर विकेटने भरुन काढली, फायनलमध्ये घातला धुमाकूळ, बनली बॉलिंग क्वीन

WPL 2023 Purple Cap Winner : WPL 2023 मध्ये भारतीय महिला गोलंदाजांची कामगिरी कशी होती? ते सुद्धा जाणून घ्या. मुंबई इंडियन्स फ्रेंचायजीच्या पुरुष संघाला जे जमलं नव्हतं, ते महिला टीमने करुन दाखवलं

WPL 2023 Purple Cap Winner : धावांची कसर विकेटने भरुन काढली, फायनलमध्ये घातला धुमाकूळ, बनली बॉलिंग क्वीन
Mumbai indians Image Credit source: wpl
Follow us
| Updated on: Mar 27, 2023 | 9:47 AM

WPL 2023 Purple Cap Winner : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने वूमेन्स प्रीमियर लीगच्या पहिल्या सीजनच जेतेपद पटकावलं आहे. रविवारी ब्रेबॉर्न स्टे़डियमवर फायनलचा सामना झाला. या मॅचमध्ये दिल्ली कॅपिटल्सला 7 विकेटने नमवून मुंबई इंडियन्सने जेतेपदाची ट्रॉफी उचलली. आयपीएलच्या पहिल्या सीजनमध्ये मुंबई इंडियन्सला विजेतेपद मिळवता आलं नव्हतं. पण याच फ्रेंचायजीच्या महिला टीमने WPL च्या पहिल्या हंगामात ही कमाल करुन दाखवली.

या संपूर्ण सीजनमध्ये मुंबई इंडियन्सच्या टीमने शानदार खेळ दाखवला. सर्वाधिक विकेट घेणाऱ्या टॉप 5 गोलंदाजांच्या यादीवरुन ही कल्पना येते. हॅली मॅथ्यूज नंबर 1 राहिली, तिने पर्पल कॅप मिळवली.

आयपीएलच्या धर्तीवर WPL मध्ये सुद्धा पर्पल कॅप

आयपीएलच्या धर्तीवर WPL मध्ये सुद्धा पर्पल कॅप दिली. मोसमात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप दिली जाते. सीजन सुरु असताना ही कॅप वेगवेगळ्या गोलंदाजांच्या डोक्यावर जात असते. सीजनच्या अखेरीस ही कॅप कोणाला मिळणार? ते स्पष्ट होतं.

बॅटने नाही, चेंडूने कमाल

WPL च्या पहिल्या सीजनची पर्पल कॅप मुंबई इंडियन्सच्या हॅली मॅथ्यूजने मिळवली. वेस्ट इंडिजची ही ऑलराऊंडर तुफानी बॅटिंगसाठी ओळखली जाते. या लीगमध्ये मॅथ्यूज ऑरेंज कॅप मिळवू शकली नाही. पण तिने आपल्या ऑफ स्पिनचा जलवा दाखवला. सर्वाधिक विकेट घेऊन ती नंबर 1 राहिली. मॅथ्यूजने 10 मॅचमध्ये 5.94 च्या इकॉनमीने 202 धावा देऊन 16 विकेट घेतल्या.

फायनलमध्ये मॅथ्यूजच प्रदर्शन कसं होतं?

फायनल मॅचमध्ये तिने दमदार खेळ दाखवला. चार ओव्हरपैकी दोन मेडन टाकल्या. पाच रन्स देऊन तीन विकेट घेतल्या. यूपी वॉरियर्सच्या सोफी एक्लस्टनने 6.61 इकॉनमीने 235 धावा देऊन 16 विकेट काढल्या. मॅथ्यू आणि सोफीच्या विकेट समान होतच्या. पण मॅथ्यूजची इकॉनमी सोफीपेक्षा चांगली होती. त्यामुळे पर्पल कॅप मॅथ्यूजला मिळाली. भारतीय खेळाडू फेल

लीगच्या पहिल्या सीजनमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या टॉप 5 यादीत एकच भारतीय आहे. टॉप 10 मध्ये भारताच्या फक्त दोन गोलंदाज आहेत. साइक इशाकशिवाय शिखा पांडे टॉप 10 मध्ये आहे. शिखा सातव्या नंबरवर आहे. तिने 9 सामन्यात 6.59 च्या सरासरीने 211 धावा देऊन 10 विकेट काढल्या.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.