AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WPL 2024, GGT vs RCB : गुजरातचं बंगळुरुसमोर अवघ्या 108 धावांचं आव्हान, जायंट्सचे गोलंदाज रोखणार का?

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत पाचवा सामना गुजरात जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सुरु आहे. गुजरातने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 गडी गमवून 107 धावा केल्या आणि विजयासाठी 108 धावांचं आव्हान दिलं आहे. त्यामुळे गुजरातच्या गोलंदाजांपुढे मोठं आव्हान असणार आहे.

WPL 2024, GGT vs RCB : गुजरातचं बंगळुरुसमोर अवघ्या 108 धावांचं आव्हान, जायंट्सचे गोलंदाज रोखणार का?
| Updated on: Feb 27, 2024 | 9:20 PM
Share

मुंबई : वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत गुजरात जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार स्मृती मंधाना हिचा हा निर्णय खरा ठरला. गोलंदाजांनी अपेक्षित गोलंदाजी केली आणि गुजरातला अवघ्या 107 धावांवर रोखलं आणि विजयासाठी 108 धावांचं आव्हान मिळालं आहे. 120 चेंडूत 108 धावा करणं टी20 क्रिकेटमध्ये सहज सोपं आहे. त्यामुळे गुजरातच्या गोलंदाजांचा कस लागणार आहे. आता गुजरातचे गोलंदाजी दिलेलं आव्हान रोखतात का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

गुजरातचा डाव

गुजरातचा डाव अडखळत सुरु झाला. बेथ मूनीच्या रुपाने पहिला धक्का बसला. अवघ्या 8 धावांवर असताना तंबूत परतली. त्यानंतर फोइबे लिचफिल्डही काही खास करू शकली नाही. 5 धावा करून रेणुका सिंगच्या गोलंदाजीवर बाद झाली. वेदा कृष्णमूर्तीकडून खूप अपेक्षा होत्या. मात्र या अपेक्षांचा भंग झाला. 9 धावा करून माघारी परतली. एकीकडे फलंदाज झटपट बाद होत होते तेव्हा हरलीन देओलने मोर्चा सांभाळला होता. पण दुर्दैवाने 22 धावांवर रनआऊट झाली आणि सर्वकाही फिस्कटलं. अशले गार्डनर काहीतरी खास करेल असं वाटलं होतं. पण तिचा डावही 7 धावांवर आटोपला. दयालान हेमलथाने सर्वाधिक नाबाद 31 धावा केल्या. या व्यतिरिक्त तळाचा एकही फलंदाजी चांगली कामगिरी करू शकला नाही. कॅथरीन ब्रायस 3, स्नेह राणा 12 धावा करून बाद झाले.

बंगळुरुकडून सोफी सोभना हीने सर्वाधिक तीन गडी बाद केले. त्यानतर रेणुका ठाकुर हीला दोन गडी बाद करण्यात यश आलं. तर जॉर्जिया वारेहम हीने एक गडी बाद केला. आता बंगळुरु दिलेलं आव्हान झटपट पूर्ण गुणतालिकेत पहिल्या स्थानावर जाण्यासाठी प्रयत्न करेल.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

गुजरात जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): बेथ मुनी (कर्णधार/विकेटकीपर), वेदा कृष्णमूर्ती, हरलीन देओल, फोबी लिचफील्ड, दयालन हेमलता, ॲशलेग गार्डनर, कॅथरीन ब्राइस, स्नेह राणा, तनुजा कंवर, ली ताहुहू, मेघना सिंग.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला (प्लेइंग इलेव्हन): सोफी डेव्हाईन, स्मृती मानधना (कर्णधार), सभिनेनी मेघना, एलिस पेरी, रिचा घोष (विकेटकीपर), जॉर्जिया वेरेहम, सोफी मोलिनक्स, श्रेयंका पाटील, सिमरन बहादूर, आशा शोभना, रेणुका ठाकूर सिंग

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.