WPL 2024, RCB vs DC : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने जिंकला नाणेफेकीचा कौल, अशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत सातवा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेजर्स बंगळुरु यांच्यात होत आहे. नाणेफेकीचा कौल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या बाजूने लागला असून प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे. तसेच दोन्ही संघांनी प्लेइंग इलेव्हन अशी असणार आहे.

WPL 2024, RCB vs DC : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने जिंकला नाणेफेकीचा कौल, अशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
WPL 2024, RCB vs DC : नाणेफेकीचा कौल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या बाजूने, दोन्ही संघांनी या खेळाडूंना दिली संधी
Follow us
| Updated on: Feb 29, 2024 | 7:11 PM

मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात वुमन्स प्रीमियर लीगचा सातवा सामना होत आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत स्पर्धेत प्रत्येकी दोन सामने खेळले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने दोन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. दिल्ली कॅपिटल्सने एका सामन्यात विजय, तर एका सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात कोण बाजी मारतं याकडे लक्ष लागून आहे. दरम्यान नाणेफेकीचा कौल जिंकत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. रात्री उशिरा पडत असलेलं दव पाहता हा निर्णय घेतला आहे. कारण दुसऱ्या सत्रात गोलंदाजी करणं कठीण होतं. वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत हे दोन्ही दोन वेळा आमनेसामने आले आहेत. दोन्ही सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला पराभवाचं पाणी पाजलं आहे. त्यामुळे बंगळुरु स्पर्धेतील विजयी घोडदौड कायम ठेवण्यासाठी, तर दिल्ली कॅपिटल्स स्पर्धेतील रेकॉर्ड कामय ठेवण्यासाठी मैदानात उतरतील.

स्मृती मंधाना म्हणाली की, ” आम्हाला प्रथम क्षेत्ररक्षण करायचे आहे. पहिल्या 5-6 षटकांमध्ये गोलंदाजांसाठी काहीतरी असते असा ट्रेंड आपण पाहिला आहे.तसेच ठराविक खेळाडूंवर अवलंबून राहू नये. सर्व इलेव्हन स्वत:च्या बळावर एक सामना जिंकण्यासाठी पुरेशी आहेत. पेरी आजारपणामुळे बाहेर असून नदीनला संघात स्थान मिळालं आहे.” दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार मेग लॅनिंगनेही गोलंदाजी घेणार होतं असं सांगितलं आहे. “आम्ही गोलंदाजी घेणार होतो पण तोच ट्रेंड आहे असे दिसते. परंतु गेमद्वारे ट्रॅक फारसा बदलणार नाही. काहीवेळा गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होतात तर कधी टी20 क्रिकेटमध्ये तसे होत नाही. ॲनाबेल सदरलँडऐवजी संघात जेस जोनासेनला घेतलं आहे.”

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

दिल्ली कॅपिटल्स महिला (प्लेइंग इलेव्हन): मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, ॲलिस कॅप्सी, मारिझान कॅप, जेस जोनासेन, अरुंधती रेड्डी, मिन्नू मणी, तानिया भाटिया (विकेटकीपर), राधा यादव, शिखा पांडे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मानधना (कर्णधार), सोफी डेव्हाईन, सभिनेनी मेघना, नदिन डी क्लर्क, रिचा घोष (विकेटकीपर), जॉर्जिया वेरेहम, सोफी मोलिनक्स, श्रेयंका पाटील, सिमरन बहादूर, आशा शोभना, रेणुका ठाकूर सिंग.

'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.