WPL 2025 MI vs GG : मुंबई-गुजरातमध्ये दुसऱ्या क्रमांकासाठी चुरस, पलटण पछाडणार?
WPL 2025 MI vs GT Match And Points Table : दिल्लीनंतर गुजरात आणि मुंबईने प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला आहे. मात्र त्यानंतर आता गुजरात आणि मुंबईत दुसऱ्या स्थानासाठी चुरस आहे. मुंबईकडे गुजरातला खेचण्याची संधी आहे.

वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील तिसऱ्या हंगामातील (WPL 2025) प्लेऑफसाठी 3 संघ निश्चित झाले आहेत. दिल्ली कॅपिट्ल्सनंतर गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांनी प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला. दिल्लीने साखळी फेरीतील सर्व म्हणजेच 8 पैकी 5 सामने जिंकले. दिल्ली 10 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी विराजमान आहे. दिल्ली प्लेऑफमध्ये पोहचणारी पहिली टीम ठरली. त्यानंतर गुजरात आणि मुंबई दोन्ही संघांनी 8-8 गुणांसह प्लेऑफमध्ये प्रवेश केला. तर यूपी वॉरियर्जनंतर गतविजेता रॉयल चॅलेंजर्सं बंगळुरु या दोन्ही संघांचा साखळी फेरीतूनच बाजार उठला.
यूपीचे सर्व 8 सामने खेळून झाले आहेत. यूपीने 8 पैकी फक्त 3 सामने जिंकले. तर 5 सामने गमावले. तर गतविजेत्या आरसीबीला 7 पैकी 2 सामनेच जिंकता आले. त्यामुळे आरसीबीचा साखळी फेरीतील आठवा आणि अंतिम सामना जिंकून शेवट गोड करण्याचा प्रयत्न असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला मुंबई विरुद्ध गुजरात यांच्यात आज 10 मार्च रोजी दुसऱ्या स्थानासाठी जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे.
दुसऱ्या स्थानासाठी रस्सीखेच
गुजरातचा मुंबईविरुद्धचा हा या हंगामातील साखळी फेरीतील शेवटचा सामना असणार आहे. गुजरात 7 पैकी 4 सामने जिंकून 8 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये +0.334 नेट रनरेटसह दुसऱ्या स्थानी आहे. तर मुंबई इंडियन्स 6 पैकी 4 सामने जिंकून 8 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये +0.267 अशा नेट रनरेटसह तिसऱ्या स्थानी आहे. त्यामुळे मुंबई विरुद्ध गुजरात या सामन्यात दोन्ही संघात दुसऱ्या स्थानासाठी रस्सीखेच असणार आहे. आता गुजरात साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात विजयासह दुसरं स्थान कायम राखते? की पलटण मात करत बाजी मारते? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
मुंबई इंडियन्स वू्मन्स टीम: हरमनप्रीत कौर (कर्णधार), हेली मॅथ्यूज, अमेलिया केर, नॅट सायव्हर-ब्रंट, अमनजोत कौर, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), सजीवन सजना, जी कमलिनी, संस्कृती गुप्ता, शबनीम इस्माईल, पारुनिका सिसोदिया, अमनदीप कौर, अक्षिता माहेश्वरी, जिंतिमणी कलिता, सायका इशाक, कीर्थना बालकृष्णन, नादिन डी क्लर्क आणि क्लो ट्रायॉन.
गुजरात जायंट्स वूमन्स टीम : ॲशले गार्डनर (कर्णधार), बेथ मुनी (विकेटकीपर), दयालन हेमलता, हरलीन देओल, डिआंड्रा डॉटिन, फोबी लिचफिल्ड, काशवी गौतम, भारती फुलमाली, मेघना सिंग, तनुजा कंवर, प्रिया मिश्रा, लॉरा वोल्वार्ड, डॅनियल गिब्सन, सिमरन शेख, मन्नत कश्यप, शबनम एमडी शकील, प्रकाशिका नाईक आणि सायली सातघरे.
