इंग्लंड दौऱ्याआधी भारतीय संघाला मोठा दिलासा, भारतीय संघाचा दिग्गज कोरोनाविरुद्धची मॅच जिंकला!

इंग्लंड दौऱ्याआधी भारतीय संघासाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय संघाचा विकेट कीपर फलंदाज वृद्धिमान साहाने (Wridhiman Saha) कोरोनाविरुद्धची मॅच जिंकली आहे. (Wridhiman Saha tested Covid 19 Negative before India tour of England)

इंग्लंड दौऱ्याआधी भारतीय संघाला मोठा दिलासा, भारतीय संघाचा दिग्गज कोरोनाविरुद्धची मॅच जिंकला!
वृद्धिमान साहाची कोरोनावर मात...
Follow us
| Updated on: May 18, 2021 | 12:07 PM

मुंबई : इंग्लंड दौऱ्याआधी भारतीय संघासाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय संघाचा विकेट कीपर फलंदाज वृद्धिमान साहाने (Wridhiman Saha) कोरोनाविरुद्धची मॅच जिंकली आहे. साहाचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. साहा लवकरच मुंबईत इंग्लंडला जाण्यासाठी टीम इंडियाच्या ताफ्यात सामिल होईल. (Wridhiman Saha tested Covid 19 Negative before India tour of England)

इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या 14 व्या पर्वादरम्यान वृध्दिमान साहाला कोरोनाचा संसर्ग जडला होता. 4 मे रोजी त्याचा कोरोना अहवाल सकारात्मक आढळला होता. आयपीएल स्थगित होण्यापूर्वी तो आयसोलेट झाला होता. साहाच्या कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्सचा सामना पुढे ढकलण्यात आला आणि संपूर्ण संघ क्वारंटाईन करण्यात आला होता.

भारतीय संघाला दिलासा

साहाने जवळपास 15 दिवस कोरोनाशी झुंज दिली. डॉक्टरांच्या  निगराणीखाली त्याच्यावर उपचार सुरु होते. हळूहळू त्याची प्रकृती पूर्वपदावर येत होती. अखेर सोमवारी त्याचा कोरोना अहवाल नकारात्मक आलाय. साहाचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याने इंग्लंड दौऱ्याआधी भारतीय संघाला मोठा दिलासा मिळाला आहे.

साहाला दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे साहाचे कुटुंबीय घाबरले होते. चिमुकल्या लेकीने साहाला बरं वाटावं म्हणून खास संदेश पाठवला. तो संदेश वाचून वृद्धिमान साहाला गहिवरायला झालं. सध्याच्या प्रसंगी हीच माझी संपूर्ण दुनिया आहे. मियाने बरं होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तुम्हा सगळ्यांच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद, आपल्या सगळ्यांचे आभार!

ऋद्धिमान साहा केवळ 2 सामने खेळला

आयपीएलच्या 14 व्या पर्वात साहा केवळ 2 सामने खेळला. साहा सनरायजर्स हैदराबादकडून खेळताना विकेट कीपिंग तसंच डावाची सुरुवात करतो. सध्या साहाचा फॉर्म ठीक नाहीय. त्यामुळे संघाने त्याला अंतिम 11 मधून वगळलं होतं. परंतु यंदाच्या मोसमात त्याने 2 सामने खेळले होते.

साहा लवकरच मुंबईत

भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. त्यामध्ये साहाचाही समावेश आहे. इंग्लंडला रवाना होण्यासाठी विराटसेनेला मे अखेरीस मुंबईत एकत्र व्हायचे आहे. साहा लवकरच मुंबईत इंग्लंडला जाण्यासाठी टीम इंडियाच्या ताफ्यात सामिल होईल.

इंग्लंड दौऱ्यासाठी अशी आहे टीम इंडिया :

विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत (विकेटकीपर), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव

हे ही वाचा :

अर्थशास्त्राचं ज्ञान घेऊन भारतीय संघात दाखल, चेन्नईसाठी असं शतक ज्या शतकाने करिअरला बळ दिलं!

तौक्ते चक्रीवादळचा तडाखा, वानखेडे स्टेडियमची अशी झाली अवस्था, फोटो व्हायरल

धोनीकडून जाडेजाची नक्कल, आता ‘सर जाडेजा’चा भन्नाट रिप्लाय

मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.