AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WTC 2023 Final Ind vs Aus Video : लॉर्ड शार्दुल पावला आणि भरतनं घेतला वॉर्नरचा जबरदस्त असा झेल, रोहित शर्माची डोकेदुखी दूर

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात सामना सुरु आहे. भारताने पहिल्या सत्रात वॉर्नरने टीम इंडियावर दबाव ठेवला होता. पण शार्दुल ठाकुरने रोहित शर्माचं टेन्शन दूर केलं.

WTC 2023 Final Ind vs Aus Video : लॉर्ड शार्दुल पावला आणि भरतनं घेतला वॉर्नरचा जबरदस्त असा झेल, रोहित शर्माची डोकेदुखी दूर
WTC 2023 Final Ind vs Aus :केएल भरतचा सुपर कॅच, शार्दुल ठाकुरचा भेदक मारा, वॉर्नर असा फसला जाळ्यात Watch Video
| Updated on: Jun 07, 2023 | 5:17 PM
Share

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत वेगवान गोलंदाजांना हिरव्या खेळपट्टीमुळे महत्त्व प्राप्त झालं आहे. त्यामुळे संघात आर. अश्विन ऐवजी शार्दुल ठाकुरला स्थान देण्यात आलं आहे. पहिल्या सत्रातील चौथ्या षटकात मोहम्मद सिराजने आपल्या गोलंदाजीची चुणूक दाखवून दिली. त्याने उस्मान ख्वाजाला शून्यावर बाद करून तंबूत पाठवलं. त्यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि लाबुशेन यांनी संघाचा डाव सावरला. दुसऱ्या गड्यासाठी त्यांनी भारतीय गोलंदाजांना चांगलंच झुंजवलं. इतकंच काय तर उमेश यादवच्या गोलंदाजीची पिसं काढली. वॉर्नरला सहावेळा बाद करणाऱ्या उमेश यादवला आस्मान दाखवलं. वॉर्नरने एकाच षटकात चार चौकार ठोकले. त्यामुळे कर्णधार रोहित शर्माच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. कारण वॉर्नर टिकला तर काही खरं नाही याची त्याला जाणीव होती. पण लॉर्ड शार्दुल पावला आणि भरतने संधीचं सोनं केलं.

21 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर लेग साईडला आखुड टप्प्याचा गोलंदाज टाकला. हा चेंडू खेळणं वॉर्नरला चांगलंच कठीण गेलं. वॉर्नरच्या बॅटला चेंडू लागला आणि विकेटकीपर श्रीकर भरतने संधी साधली. उजव्या बाजूला उडी घेत कठीण झेल पकडला आणि त्याला तंबूचा रस्ता दाखवला. डेविड वॉर्नरने 60 चेंडूत 43 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये 8 चौकारांचा समावेश आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि स्कॉट बोलँड.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, श्रीकर भरत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी दोन्ही संघ

WTC Final साठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.

राखीव खेळाडू | सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल आणि मुकेश कुमार

WTC Final साठी टीम ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स (कॅप्टन), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, मायकेल नेसर, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.

राखीव खेळाडू | मिचल मार्श आणि मॅथ्यू रेनशॉ.

हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.