AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WTC Final Weather Update : पाचव्या दिवशी खेळ होणार की नाही? साऊदम्पटनमधील हवामानाचे ताजे फोटो समोर

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरु असलेल्या वर्ल्‍ड टेस्‍ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात (WTC Final 2021) पहिल्या दिवशीपासून पावसाचा व्यत्यय सुरुच आहे. पहिल्या दिवशीप्रमाणे चौथ्या दिवशीचा खेळही पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यानंतर आता पाचव्या दिवशीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

WTC Final Weather Update : पाचव्या दिवशी खेळ होणार की नाही? साऊदम्पटनमधील हवामानाचे ताजे फोटो समोर
WTC Final 2021
Follow us
| Updated on: Jun 22, 2021 | 2:23 PM

WTC Final Weather Update : इंग्लंडच्या साऊदम्पटन येथील मैदानात सुरु असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात (ICC WTC Final) पहिल्या दिवशीपासून पाऊस, कमी सूर्यप्रकाश अशा हवामानासंबधी बाबींचा अडथळा समोर येत आहे. पहिल्य आणि चौथ्या दिवशीचा तर संपूर्ण खेळच पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे सर्वच क्रिकेट रसिकांचा हिरमोड झाला. त्यात आता पाचव्या दिवशी खेळ होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. दरम्यान भारतीय क्रिकेटपटू दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) जो सध्या इंग्लंडमध्ये कॉमेन्ट्रीसाठी गेला आहे. त्याने साऊदम्पटन मैदानातील हवामानाचे ताजे अपडेट देत फोटोही शेअर केला आहे. (WTC Final 2021 india vs New Zealand Match 5th days Southampton Weather Forecast from Southampton ground Latest Photos Shared By Dinesh Karthik)

दिनेशने हवामानाचे ताजे अपडेट्स देत शेअर केलेल्या फोटोमध्ये आज दिवसभर वातावरण साफ राहणार असल्याचे दिसून येत आहे. इंग्लंडमध्ये अधिक काळ असणारं ढगाळ वातावरणच आजही असणार असून त्यामध्ये खेळ होऊ शकतो अशी माहिती कार्तिकने आपल्या ट्विटरवरुन दिली आहे.

पुन्हा दिनेशनेच दिली माहिती

दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरु होण्यापूर्वी हवामानाची स्थिती सर्वात आधी भारताचा क्रिकेटपटू दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) जो सद्या कॉमेन्ट्री करण्यासाठी इंग्लंडला आहे त्यानेच दिली होती. दिनेशने मैदानाचे ताजे फोटो शेअर करत तेथे सूर्य उगवला असून आजचा खेळ होणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर चौथ्या दिवशीही दिनेशनेच मैदानाचे फोटो शेअर करत ‘हवामान तितके खास नाही’ असे कॅप्शन देत सामना खेळवला जाण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले होते.

सामन्यावर किंवींची पकड

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यावर (WTC Final 2021) न्यूझीलंडने मजबूत पकड मिळवली आहे. सामन्याचा तिसरा दिवस पूर्णपणे किवी खेळाडूंनी गाजवला होता. आधी गोलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भारताचा संघ 217 धावांत गारद केला. त्यानंतर फलंदाजांनी भारताचा गोलंदाजांना जेरीस आणलं. तिसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंडने 2 बाद 101 धावांपर्यंत मजल मारली आहे. भारताकडे सध्या 116 धावांची आघाडी शिल्लक आहे. परंतु भारताला 49 षटकांमध्ये केवळ दोनच बळी मिळवता आल्याने सामन्यात सध्यातरी न्यूझीलंड सरस आहे.

रिजर्व्ह डे बाबत आयसीसीकडून महत्त्वाची माहिती

सामन्यात कोणताही व्यत्यय आल्यास आयसीसीने सामना सुरु होण्याआधीच 23 जून हा दिवस राखीव ठेवला होता. दरम्यान सध्याची परिस्थिती पाहता राखीव दिवशी खेळ खेळवावा लागणार असल्याने या दिवशीच्या तिकीट आणि प्रवेशांबाबत आयसीसीने महत्त्वाची माहिती दिली आहे. आयसीसीच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला दिलेल्या माहितीत म्हटलं की, ‘सहाव्या दिवशी खेळवल्या जाणाऱ्या खेळाच्या तिकीटांचे दर कमी केले जाणार आहेत. तसेच ब्रिटनमध्ये होणाऱ्या सामन्यांची ही स्टँडर्ड प्रैक्टिस असल्याने केवळ ब्रिटनच्या नागरिकांनाच सामन्याला येण्याची परवानगी दिली जाईल.’

…नाहीतर ट्रॉफी शेअर केली जाणार

सामन्यात पाचवा दिवस आणि राखीव दिवस पकडून 2 दिवस अजून शिल्लक आहेत. मात्र दोन दिवसांतही कोणता ठोस निर्णयापर्यंत सामना न पोहोचल्यास दोन्ही संघाना विजेता घोषित करुन ट्रॉफी शेअर केली जाणार आहे. तसेच विजयाची रक्कम ही वाटून दिली जाईल. सामना पूर्ण न होण्याची शक्यता अधिक असण्याचे कारण न्यूझीलंड संघाचा पहिला डावही अजून पूर्ण झालेला नाही. एकीकडे भारताने पहिल्या डावात 217 धावा केल्या आहेत  तर न्यूझीलंडचा संघ 101 धावांवर दोन बाद अशा स्थितीत आहे.

हे ही वाचा :

ICC WTC Final : 196 ओव्हर ठरवणार विजेता, जाणून घ्या कोणता संघ होणार विजयी

WTC Final 2021 : फायनल सामना ड्रॉ झाला तर भारताला मोठं नुकसान, न्यूझीलंड फायद्यात!

WTC Final सामन्यातील भारतीय गोलंदाजाच्या काही सुपरफास्ट डिलेव्हरीज, आयसीसीने शेअर केलेला ‘हा’ व्हिडीओ पाहाच

(WTC Final 2021 Southampton Weather Forecast india vs New Zealand Match 5th day Updates from Southampton ground)

'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत
'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत.
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'.
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली.
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्...
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्....
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?.
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'.
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!.
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक.
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'.
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली.