AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WTC Final : साऊदम्पटनमधून दिनेश कार्तिकने दाखवले हवामानाचे ताजे फोटो, आजच्या खेळाची स्थिती स्पष्ट

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरु असलेल्या वर्ल्‍ड टेस्‍ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात (WTC Final 2021) पहिल्या दिवशीपासून पावसाचा व्यत्यय सुरुच आहे. पहिल्या दिवशीप्रमाणे चौथ्या दिवशीचा खेळही पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे आजच्या निर्णयाक दिवशी कसं वातावरण आहे. याबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

WTC Final : साऊदम्पटनमधून दिनेश कार्तिकने दाखवले हवामानाचे ताजे फोटो, आजच्या खेळाची स्थिती स्पष्ट
dinesh karthik wtc
Follow us
| Updated on: Jun 23, 2021 | 1:40 PM

WTC Final Weather Update : इंग्लंडच्या साऊदम्पटन येथील मैदानात सुरु असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना (ICC WTC Final) ऐन रंगात आला आहे.  पहिल्या दिवशीपासून पाऊस, कमी सूर्यप्रकाश अशा हवामानासंबधी बाबींच्या अडथळ्यामुळे प्रत्येक दिवशी आजतरी सामना होईल का? होईल तर किती ओव्हर्सचा? असे प्रश्न क्रिकेट रसिकांसमोर असतात. अशावेळी मदतीला धावून येत आहे तो म्हणजे भारतीय क्रिकेटपटू दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) जो कॉमेन्ट्रीसाठी इंग्लंडमध्ये उपस्थित आहे. दिनेशने याआधी प्रत्येक दिवशी सर्वांत आधी साऊदम्पटन मैदानातील हवामानाची स्थितीबाबत कळवले असून आजच्या दिवसाबाबतही दिनेशने महत्त्वाची माहिती देत फोटो शेअर केले आहेत. (WTC Final 2021 india vs New Zealand Match 6th days Southampton Weather Forecast from Southampton ground Latest Photos Shared By Dinesh Karthik)

दिनेशने शेअर केलेल्या फोटोमध्ये हवामान साफ असून मैदानात काही प्रमाणआत सूर्यप्रकाश पडलेलाही दिसून येत आहे. दिनेशने फोटोना आतापर्यंतच्या सामन्यातील दिवसांपैकी आजचं हवामान सर्वांत चांगलं आहे. असं कॅप्शनही दिल्यामुळे क्रिकेट प्रेमींची उत्सुकता आणखीच वाढली आहे.

आतापर्यंतच्या सामन्याचा धावता आढावा

सर्वात आधी न्यूझीलंडने टॉस जिंकून गोलंदाजी घेतली. भारताला 217 धावांवर ऑलआऊट करुन न्यूझीलंडने 249 धावा केल्या आणि भारतावर 32 रनांची आघाडी मिळवली. त्यानंतर भारत आता आपला दुसरा डाव खेळत असून पाचव्या दिवसाखेर भारताची स्थिती 64 वर 2 बाद अशी आहे. सध्या विराट (8) आणि पुजारा (12) खेळत आहेत.

हे ही वाचा :

WTC Final : ‘सुपरमॅन’ शुभमन, चित्त्यासारखी झेप घेत पकडला झेल, सोशल मीडियावर कौतुकाचा पाऊस

WTC Final : टॉवेल बाधून मैदानात उतरला मोहम्मद शमी, फोटो पाहून चाहते लोट-पोट, म्हणाले सावरीया 2.0

WTC Final 2021 : फायनल सामना ड्रॉ झाला तर भारताला मोठं नुकसान, न्यूझीलंड फायद्यात!

(WTC Final 2021 india vs New Zealand Match 6th days Southampton Weather Forecast from Southampton ground Latest Photos Shared By Dinesh Karthik)

'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत
'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत.
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'.
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली.
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्...
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्....
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?.
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'.
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!.
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक.
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'.
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली.