AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WTC Final Weather Update : साऊथॅम्प्टनमधून आनंदाची बातमी, क्रिकेटपटूने शेअर केले ताजे फोटो, मॅचची वेळही बदलली

भारत आणि न्‍यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशिपच्या अंतिम सामन्याचा पहिला दिवस पावसाने खराब केला. दरम्यान आजचे तेथील वातावरण कसे आहे याचे फोटो तेथे उपस्थित क्रिकेटपटूने शेअर केले आहेत.

WTC Final Weather Update : साऊथॅम्प्टनमधून आनंदाची बातमी, क्रिकेटपटूने शेअर केले ताजे फोटो, मॅचची वेळही बदलली
WTC Final 2021
Follow us
| Updated on: Jun 19, 2021 | 1:28 PM

साऊथॅम्प्टन : भारत आणि न्‍यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशिपच्या (ICC World Test Championship Final) अंतिम सामन्याचा पहिला दिवस पावसाने खराब केला. शुक्रवारी सकाळपासूनच साऊथॅम्पटनमध्ये (Southampton) पावसाची रिमझिम सुरु होती. यामुळे नाणेफेकदेखील झाली नाही. मैदानावरील पंचांनी वेळोवेळी खेळपट्टी खेळण्यासाठी योग्य आहे का, याची पाहणी केली. दरम्यान आज मात्र साऊथॅम्पटनमधील वातावरण परिस्थितीबाबत एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. कॉमेन्ट्रीसाठी तिथे उपस्थित असलेल्या दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) मैदानाचे ताजे फोटो शेअर केले आहेत. (WTC Final 2021 India vs New Zealand play Abandoned Due To Rain second days Weather Updates from Southampton may game restart soon)

पहिल्या दिवशीचा खेळ रद्द झाल्यामुळे खेळाडूंसह सर्वच क्रिकेट रसिकांचा हिरमोड झाला. त्यामुळे दुसऱ्यादिवशी म्हणजे आजतरी सामना होतोका याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते. दरम्यान कार्तिकने शेअर केलेल्या फोटोमध्ये मैदानावर चांगल ऊन पडलं असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे असेच वातावरण राहिल्यास या बहुप्रतीक्षीत सामन्याला नक्की सुरुवात होईल.

सामन्याच्या वेळेत बदल

पहिल्या दिवशीचा खेळ पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे दुसऱ्या दिवशी अर्धा तास आधी म्हणजेच भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी सुरु केला जाईल. तसेच पावसाने पुन्हा खोडा न घातल्यास संपूर्ण 98 ओव्हरचा खेळ खेळवला जाईल. तसेच पावासाने पुन्हा व्यत्यय आणल्यास 60 ते 70 ओव्हरचा खेळही खेळवला जाऊ शकतो. मात्र इंग्लडच्या हवामानाबाबत कोणतीही पुष्टी केली जाऊ शकत नसल्याने वातावरण कधीही बदलण्याची शक्यता ही नाकारता येत नाही. जी काही परिस्थिती आहे ती पुढील काही तासांतच स्पष्ट होईल.

हे ही वाचा :

Ind vs NZ : पहिल्या दिवसाचा खेळ रद्द् झाल्यावर, खेळाडू रंगले ‘या’ खेळात, पाहा व्हिडीओ

WTC अंतिम सामन्यात भारताची बॅटिंग ऑर्डर कशी असेल? याअगोदर साऊथॅम्प्टन कुणाची कामगिरी कशी?

WTC 2021 : 2019 वर्ल्ड कप सेमी फायनलचा बदला घेणार का टीम इंडिया?, पाहा काय घडलं होतं त्या दिवशी..!

(WTC Final 2021 India vs New Zealand play Abandoned Due To Rain second days Weather Updates from Southampton may game restart soon)

ऑपरेशन सिंदूर आता फक्त स्थगित केलंय... पंतप्रधान मोदींचं मोठं विधान
ऑपरेशन सिंदूर आता फक्त स्थगित केलंय... पंतप्रधान मोदींचं मोठं विधान.
Operation Sindoor हे फक्त नाव नाही तर... पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
Operation Sindoor हे फक्त नाव नाही तर... पंतप्रधान मोदी काय म्हणाले?.
ऑपरेशन सिंदूरवर पहिल्यांदाच बोलताना मोदींकडून भारतीय लष्कराला सॅल्यूट
ऑपरेशन सिंदूरवर पहिल्यांदाच बोलताना मोदींकडून भारतीय लष्कराला सॅल्यूट.
असीम मुनीरनं असं काही केलं की पाकिस्तानी लोकांनाही वाटेल त्याची लाज
असीम मुनीरनं असं काही केलं की पाकिस्तानी लोकांनाही वाटेल त्याची लाज.
अतिरेक्यांच्या अंत्ययात्रेचा धक्कादायक व्हिडीओ, पाक आर्मी, राजकारणी अन
अतिरेक्यांच्या अंत्ययात्रेचा धक्कादायक व्हिडीओ, पाक आर्मी, राजकारणी अन.
भारत-पाकच्या DGMO मधील फोनवरील चर्चा संपली, पाकनं दिली मोठी ग्वाही
भारत-पाकच्या DGMO मधील फोनवरील चर्चा संपली, पाकनं दिली मोठी ग्वाही.
शाहिद आफ्रिदी मोठ्या भ्रमात... म्हणतो पाकचा विजय, रॅली काढली अन्...
शाहिद आफ्रिदी मोठ्या भ्रमात... म्हणतो पाकचा विजय, रॅली काढली अन्....
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता LIVE, नेमकं काय बोलणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता LIVE, नेमकं काय बोलणार?.
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, आधी युद्धविरामासाठी विनंती अन् आता म्हणताय
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, आधी युद्धविरामासाठी विनंती अन् आता म्हणताय.
जम्मूच्या एका गावातील भिंतीत आढळला जिवंत बॉम्ब
जम्मूच्या एका गावातील भिंतीत आढळला जिवंत बॉम्ब.