Ind vs NZ : पहिल्या दिवसाचा खेळ रद्द् झाल्यावर, खेळाडू रंगले ‘या’ खेळात, पाहा व्हिडीओ

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामन्याच्या (WTC Final 2021) पहिल्या दिवशीचा खेळ पावसामुळे रद्द झाला. ज्यामुळे खेळाडूंसह सर्व क्रिकेटरसिकांचा हिरमोड झाला.

Ind vs NZ : पहिल्या दिवसाचा खेळ रद्द् झाल्यावर, खेळाडू रंगले 'या' खेळात, पाहा व्हिडीओ
r ashwin
Follow us
| Updated on: Jun 19, 2021 | 12:12 PM

साऊथॅम्प्टन : संपूर्ण क्रिकेट जगत वाट पाहत असलेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामन्यात (WTC Final 2021) पहिल्याच दिवशी पावसाने खोडा घातला. महिनाभरापासून संपूर्ण तयारी झालेल्या भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील सामन्याचा एक बॉलही पहिल्या दिवशी खेळला गेला नाही. पावसामुळे साधा टॉसही घेता आला नाही. संपूर्ण साऊथॅम्प्टनच्या (Southampton) मैदानावर पाणी साचल्याने सामन्याचा पहिला दिवसाचा खेळ रद्द झाला. त्यामुळे मैदानावर पाणी साचल्याने खेळाडूंना सरावही करता आला नाही. ज्यामुळे भारतीय क्रिकेटपटूंनी थेट एक इनडोअर गेम खेळायला सुरुवात केली. (WTC Final 2021 India vs New Zealand play Abandoned Due To Rain Then Indian Players Played Game of Dart in Southampton)

पावसामुळे सामन्याचा पहिल्या दिवशीचा खेळ रद्द झाल्यामुळे टीम इंडियाने डार्ट गेम (Game of Dart) खेळायला सुरुवात केली. बीसीसीआयने (BCCI) खेळाडूंचा खेळतानाचा व्हिडिओही ट्विट केला आहे. या व्हिडीओमध्ये भारतीय खेळाडूंसह सपोर्ट स्टाफही खेळताना दिसतो आहे. ज्यात भारताचा फिरकीपटू रवीचंद्रन आश्विन (R Ashwin) सर्वात जास्त उत्साहाने खेळताना दिसतो आहे.

शनिवारी आणि रविवारीही पावसाचा अंदाज

येणाऱ्या चार दिवसांत दररोज 98 षटके खेळली जातील अशी माहिती कळतीय. यानंतर उर्वरित षटके राखीव दिवसाच्या दिवशी पूर्ण होतील. तथापि, साउथॅम्प्टनमध्ये पुढचे चारही दिवस पाऊस सुरु राहण्याचा अंदाज आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार पुढच्या तीन ते तार दिवसांत सतत पाऊस पडेल. अशा परिस्थितीत सामन्याच्या निकालाबाबत शंका आहे.

हे ही वाचा :

WTC Final 2021 | पहिल्या दिवशी पावसाचा खोडा, खेळ रद्द, उद्या 98 षटकं खेळवणार

WTC अंतिम सामन्यात भारताची बॅटिंग ऑर्डर कशी असेल? याअगोदर साऊथॅम्प्टन कुणाची कामगिरी कशी?

WTC 2021 : 2019 वर्ल्ड कप सेमी फायनलचा बदला घेणार का टीम इंडिया?, पाहा काय घडलं होतं त्या दिवशी..!

(WTC Final 2021 India vs New Zealand play Abandoned Due To Rain Then Indian Players Played Game of Dart in Southampton)

Non Stop LIVE Update
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.