Shubman Gill | शुबमन गिल याची अंपायरच्या निर्णयावर अशी प्रतिक्रिया, एकदा ट्विट बघाच
Shubman Gill Cameron Green Catch | टीम इंडियाने 444 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना छान सुरुवात केली. मात्र शुबमन गिल याला अंपायरने वादग्रस्तरित्या आऊट घोषित केलं. त्यावरुन आता वाद पेटलाय.
लंडन | वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल सामन्यातील चौथ्या दिवसाचा खेळ संपला आहे. टीम इंडियाने 40 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 164 धावा केल्या आहेत. त्यामुळे टीम इंडियाला विजयासाठी आणखी 280 धावांची गरज आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल महामुकाबल्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजायसाठी 444 धावांचं डोंगराएवढं आव्हान दिलंय. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 469 धावा केल्या. त्यानंतर टीम इंडियाला 296 धावांवर ऑलआऊट केलं. यामुळे दुसऱ्या डावात 173 धावांची आघाडी मिळाली. या आघाडीसह ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव 84.3 ओव्हरमध्ये 8 बाद 270 धावांवर घोषित केला. यामुळे टीम इंडियाला 444 धावांचं आव्हान मिळालं.
चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा विराट 44 आणि अजिंक्य 20 धावांवर नाबाद परतले. टीम इंडियाने त्याआधी चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांच्या रुपात 3 विकेट्स गमावल्या. पुजाराने 27, रोहितने 43 तर शुबमनने 18 धाव केल्या. शुबमनला आऊट देण्याचा निर्णय वादग्रस्त ठरला. शुबमनला चुकीच्या पद्धतीने आऊट दिलं गेल्याचं सोशल मीडियावर म्हटलं जात आहे. अंपायरच्या या निर्णयवरुन टीम इंडियाच्या चाहत्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
शुबमन गिल याने या वादग्रस्त पद्धतीने आऊट झाल्यानंतर ट्विट केलं आहे. शुबमनने ट्विट करत आपली नाराजी जाहीर केली आहे. शुबमनने या ट्विटमध्ये कॅमरुन ग्रीन याचा कॅच घेतानाचा फोटो पोस्ट केला आहे. शुबमन याचं हे ट्विट व्हायरल झालं आहे.
शुबमन गिल याचं ट्विट
????♂️ pic.twitter.com/pOnHYfgb6L
— Shubman Gill (@ShubmanGill) June 10, 2023
नक्की काय झालं?
सामन्यातील चौथ्या डावातील आठवी ओव्हर स्कॉट बोलंड टाकायला आला. बोलंडच्या पहिल्या बॉलवर युवा शुबमन गिल याने फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र बॅटला कट लागून बॉल उंचपुऱ्या कॅमरुन ग्रीनच्या दिशेने गेला. ग्रीनने गिलचा कॅच घेतला. मात्र या दरम्यान ग्रीनने घेतलेला कॅच हा अर्धवट असल्याचं म्हटलं जात आहे. बॉलला जमिनीला स्पर्श झाल्याचं नेटकऱ्यांचं म्हणनं आहे. मात्र अंपायरने बाद दिल्याने शुबमन गिल याला माघारी परतावं लागलं. त्यामुळे नेटकऱ्यांनी संताप आणि नाराजी व्यक्त केली आहे.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन
पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि स्कॉट बोलँड.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, श्रीकर भरत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.