लंडन | टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल महामुकाबल्यात दुसऱ्या डावात 60 बॉलमध्ये 43 धावांची खेळी केली. रोहितच्या या 43 धावांच्या खेळीत 7 चौकार आणि 1 सिक्सचा समावेश होता. रोहित शर्माकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. त्यानुसार तो खेळतही होता. मात्र नको तसा फटका मारणयाच्या प्रयत्नात रोहित नेथन लायन याच्या बॉलिंगवर एलबीडब्ल्यू आऊट झाला. रोहितने या खेळीदरम्यान एक कारनामा केला आहे.
रोहित शर्मा याने ओपनर म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 13 हजार धावांचा टप्पा पार केला आहे. रोहित अशी कामगिरी करणारा तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. रोहितआधी टीम इंडियाकडून सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग या दोघांनी अशी कामगिरी केली आहे. सचिनच्या नावावर ओपनर म्हणून 15 हजार 335 धावांची नोंद आहे. तर वीरेंद्र सेहवाग याने 15 हजार 758 धावा केल्या आहेत. तर आता रोहितनेही 13 हजार धावांचा टप्पा ओलांडा आहे.
रोहित शर्माचा अफलातून विक्रम
Most runs as an opener for India in International cricket:
Virender Sehwag – 15758
Sachin Tendulkar – 15335
Rohit Sharma – 13002* pic.twitter.com/RWjihTnUJq— Johns. (@CricCrazyJohns) June 10, 2023
वीरेंद्र सहवाग | 15 हजार 758 धावा
सचिन तेंडुलकर | 15 हजार 335 धावा
रोहित शर्मा | 13 हजार धावा
सुनील गावस्कर | 12 हजार 258 धावा
शिखर धवन | 10 हजार 746 धावा
दरम्यान रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या या महाअंतिम सामन्यात पहिल्या डावातही अपयशी ठरला. रोहितने पहिल्या डावात 26 बॉलमध्ये 2 चौकारांच्या मदतीने 15 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन पॅट कमिन्स याने रोहित शर्माला एलबीडबल्यू आऊट केलं. रोहितला दुसऱ्या डावात चांगली सुरुवात मिळाली. मात्र रोहितला या खेळीचं मोठ्या आकड्यात रुपांतर करण्यात अपयश आलं.
पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि स्कॉट बोलँड.
रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, श्रीकर भरत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.