Rohit Sharma | शुबमनच्या कॅचच्या वादावरुन रोहित शर्मा याने आयसीसीची लायकी काढली

Rohit Sharma On Shubman gill catch controversy And Icc | टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने शुबमन गिल याला आऊट देण्याच्या निर्णयावरुन आयसीसीवर ताशेरे ओढले आहेत.

Rohit Sharma |  शुबमनच्या कॅचच्या वादावरुन रोहित शर्मा याने आयसीसीची लायकी काढली
Follow us
| Updated on: Jun 11, 2023 | 11:15 PM

लंडन | वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल महामुकाबल्यात टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध 209 धावांनी पराभव झाला. यासह टीम इंडियाचा सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये पराभव झाला. तसेच टीम इंडियाचा 2014 पासून एकूण चौथ्यांदा अंतिम सामन्यात पराभव झाला आहे. या सामन्यात शुबमन गिल याला कॅच आऊट देण्याचा निर्णय वादग्रस्त ठरला. शुबमनला बाद देण्याच्या निर्णयावरुन चांगलाच वाद रंगला.

नेटकऱ्यांपासून आजी माजी क्रिकेटपटूंनी या निर्णयावरुन प्रतिक्रिया दिली. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने या वादावरुन सामन्यानंतर पत्रकार परिषदेत आयसीसीची थेट लायकीच काढली. तसेच आयसीसीपेक्षा आमच्या आयपीएलमध्ये चांगल्या सोयी असल्याचं म्हटलंय.

हे सुद्धा वाचा

नक्की काय झालं?

टीम इंडियाकडून कॅप्टन रोहित शर्मा आणि शुबमन गिल ही सलामी जोडी 444 धावांच्या पाठलागासाठी मैदानात आली. रोहित-शुबमन या जोडीने आश्वासक सुरुवात केली. दोघांनी 7 ओव्हरपर्यंत 41 धावा जोडल्या. सामन्यातील चौथ्या डावातील आठवी ओव्हर स्कॉट बोलंड टाकायला आला.

बोलंडच्या पहिल्या बॉलवर युवा शुबमन गिल याने फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र बॅटला कट लागून बॉल उंचपुऱ्या कॅमरुन ग्रीनच्या दिशेने गेला. ग्रीनने गिलचा कॅच घेतला. मात्र या दरम्यान ग्रीनने घेतलेला कॅच हा अर्धवट असल्याचं म्हटलं जात आहे. बॉलला जमिनीला स्पर्श झाल्याचं नेटकऱ्यांचं म्हणनं आहे. मात्र अंपायरने बाद दिल्याने शुबमन गिल याला माघारी परतावं लागलं.

रोहित काय म्हणाला?

“मला शुबमनला बाद देण्याच्या निर्णयानंतर निराशा झाली. थर्ड अंपायरला आणखी वेळा रिप्ले पाहायला पाहिजे होतं. शुबमनला बादे देण्याचा निर्णय घाईगडबडीत घेण्यात आला तेही महाअंतिम सामन्यात”, असं रोहित म्हणाला. तसेच रोहितने आयसीसीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

रोहित शर्मा काय म्हणाला?

“महाअंतिम सामन्यात अधिकाअधिक कॅमेरा एँगल असायला हवे होते. 10 पेक्षा अधिक कॅमेरा एँगल तर आयपीएलमध्ये असतात. ही तर आयसीसीची स्पर्धा होती”, अशा शब्दात रोहितने आयसीसीच्या कारभारावर ताशेरे ओढले.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन

पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि स्कॉट बोलँड.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, श्रीकर भरत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.