Rohit Sharma याचा Wtc Final पराभवानंतर कॅप्टन्सी सोडण्याचा निर्णय? ट्विटमुळे खळबळ

Rohit Sharma Test Captaincy | वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फानयनल सामन्यात पराभव झाल्यानंतर रोहित शर्मा याचा कर्णधारपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय?

Rohit Sharma याचा Wtc Final पराभवानंतर कॅप्टन्सी सोडण्याचा निर्णय? ट्विटमुळे खळबळ
Follow us
| Updated on: Jun 11, 2023 | 8:30 PM

लंडन | टीम इंडियाने पुन्हा एकदा निराशा केलीय. टीम इंडियाचा सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये पराभव झाला आहे. न्यूझीलंडनंतर ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल सामन्यात 209 धावांनी धुव्वा उडवला आहे. यासह टीम इंडियाची आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची प्रतिक्षा आणखी लांबली आहे. तर ऑस्ट्रेलिया वनडे, टी 20, चॅम्पियन ट्रॉफीनंतर कसोटीत आयसीसी स्पर्धा जिंकणारी पहिली टीम ठरली आहे. ऑस्ट्रेलियाची ही एकूण आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची नववी वेळ ठरली आहे.

टीम इंडिया 2021 पासून मेहनतीने फायनलपर्यंत पोहचली होती. आता अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचं आव्हान होतं. मात्र ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा टांगा पलटी केला. रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडियाचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये पराभव झाला. भारताच्या पराभवानंतर रोहित निराश आणि हताश झालेला दिसला. रोहितला हा पराभव जिव्हारी लागल्याचं म्हटलं जात आहे.

हे सुद्धा वाचा

“रोहितने या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत कसोटी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतलाय. तसेच भारतीय चाहत्यांची जाहीर माफी मागितलीय. तसेच लवकरच कसोटी क्रिकेटमधूनही निवृत्त होणार”, अशा आशयाचं ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. या ट्विटमुळे क्रीडा विश्वात एकच खळबळ उडाली आहे.

मात्र हे ट्विट फेक आहे. रोहितने निवृत्तीबाबत किंवा कर्णधारपद सोडण्याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. एका युझरने रोहितचा फोटो ट्विट करत चुकीची माहिती शेअर केलेली आहे. दरम्यान हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.

व्हायरल ट्विट

रोहितकडून चाहत्यांचे आभार

“दरम्यान रोहितने सामन्यानंतर चाहत्यांनी दिलेल्या पाठींब्यासाठीआभार मानले आहेत. क्रिकेट चाहते हे आमच्या पाठीशी होते. मी प्रत्येक चाहत्याचा आभारी आहे. ते प्रत्येक रन आणि विकेटनंतर जल्लोष करत टीमचा जोश वाढवण्याचा प्रयत्न करत होते”,असं रोहितने नमूद केलं.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन

पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि स्कॉट बोलँड.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, श्रीकर भरत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.