WTC Final 2023 : विराट कोहली सुधारला नाही, फायनलमध्ये केलेल्या ‘त्या’ जुन्या चूकीने टीम इंडियाचं स्वप्न भंगलं!
Virat Kohli : विराट कोहलीच्या या चुकीचा संघाला फटका बसला. ज्याची भीती होती तेच झाले, त्यानंतर पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे विकेट पडल्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्टार खेळाडू विराट कोहली याने परत एकदी ती जुनी चूक केली.
मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल 2023 सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 209 धावांनी पराभव केला आहे. या सामन्यामध्ये पहिल्या दिवसापासून कांगारूंनी वर्चस्व राखत टीम इंडियाला कमबॅक करण्याची एकही संधी दिली नाही. पाचव्या दिवशी विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे सामना खेचून आणतील अशी सर्वांना आशा होती. रहाणेची जिगरबाज खेळी सोडली दुसऱ्या कोणत्याही खेळाडूमध्ये जिंकण्याची भूक दिसली नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्टार खेळाडू विराट कोहली याने परत एकदी ती जुनी चूक केली.
विराट कोहलीच्या या चुकीचा संघाला फटका बसला. ज्याची भीती होती तेच झाले, त्यानंतर पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे विकेट पडल्या. इंग्लंडमध्ये ज्या खराब फटक्यामुळे विराट अपयशी ठरतो, तीच चूक विराटने आजही केली. विराटच्या विकेटनंतर सहा विकेट्स झटपट पडल्या आणि टीम इंडियाचा पराभव झाला.
पाचव्या दिवशी एकच आशा होती की कोहली मोठी खेळी खेळेल. दिवसाची सुरुवातही कोहलीने दमदार केली आणि कोणतीही जोखीम न घेता मजबूत दिसला. मग शेवटी तेच घडले, ज्याची भीती वाटत होती जो गेल्या काही वर्षांपासून एक पॅटर्न बनला आहे.
पाहा व्हिडीओ –
View this post on Instagram
दरम्यान, ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप महाअंतिम सामन्यात टीम इंडियाला विजयासाठी 444 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाजांनी शरणागती पत्कारली. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला दुसऱ्या डावात 234 धावांवर ऑलआऊट केलं.
WTC Final साठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.
राखीव खेळाडू | सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल आणि मुकेश कुमार
WTC Final साठी टीम ऑस्ट्रेलिया | पॅट कमिन्स (कॅप्टन), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, मायकेल नेसर, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.
राखीव खेळाडू | मिचल मार्श आणि मॅथ्यू रेनशॉ.