WTC Final 2023 : टीम इंडियाची शेवटची बॅच लंडनमध्ये दाखल, आज कोणते प्लेयर पोहोचले?
WTC Final 2023 : आता सर्वांना वेध लागते ते महामुकाबल्याचे. 7 ते 11 जून दरम्यान दोन्ही टीम्समध्ये अंतिम सामना रंगणार आहे. WTC फायनलची तयारी करण्यासाठी टीम इंडियाचे काही खेळाडू आधीच लंडनमध्ये दाखल झाले आहेत.
लंडन : टीम इंडियाची शेवटची बॅच इंग्लंडमध्ये दाखल झाली आहे. पुढच्या आठवड्यात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल होणार आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध WTC ची फायनल खेळणार आहे. टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा WTC ची फायनल गाठली आहे. 7 ते 11 जून दरम्यान दोन्ही टीम्समध्ये अंतिम सामना रंगणार आहे. WTC फायनलची तयारी करण्यासाठी टीम इंडियाचे काही खेळाडू आधीच लंडनमध्ये दाखल झाले आहेत.
हेड कोच राहुल द्रविड, सपोर्ट् स्टाफ आणि टीम इंडियाचे प्लेयर गटागटाने इंग्लंडमध्ये पोहोचले. सोमवारी रात्री सुरु झालेली IPL 2023 ची फायनल मंगळवारी रात्री 1.30 च्या सुमारास संपली. त्यानंतर टीम इंडियाची शेवटची बॅच लंडनसाठी रवाना झाली होती.
लास्ट बॅचमध्ये कोण?
टीम इंडियाच्या शेवटच्या बॅचमध्ये अजिंक्य रहाणे, केएस भरत, शुभमन गिल, मोहम्मद शमी आणि रवींद्र जाडेजा हे खेळाडू आहेत. सर्वच खेळाडू चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स टीममधील आहेत. चेन्नई सुपर किंग्सने गुजरातला नमवून यंदाच्या सीजनच विजेतेपद पटकावलं. त्यांच आय़पीएलमधील हे पाचव विजेतेपद आहे. गिल, शमी आणि भरत गुजरात टायटन्सकडून खेळतात. रहाणे आणि जाडेजा सीएसकेच प्रतिनिधीत्व करतात. पहिल्या ट्रेनिंग सेशनमध्ये कोण होतं?
WTC फायनलसाठी टीम इंडियाचा संपूर्ण स्क्वाड इथे दाखल झालाय. हेड कोच राहुल द्रविड आता संपूर्ण टीमच ट्रेनिग सेशन घेतील. विराट कोहली, रोहित शर्मा, सिराज, शार्दुल ठाकूर आणि अक्षर पटेल यांचं पहिलं ट्रेनिंग सेशन झालं. कोहली आणि रोहितने बॅटिंगचा सराव केला. अक्षर, शार्दुल आणइ सिराजने बॉलिंग टाकली. ओव्हलमधील कंडीशन्स परिस्थिती भारतापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे.