Gautam Gambhir: खराब फॉर्ममध्ये असलेल्या KL Rahul बद्दल गंभीर स्पष्टच बोलला

Gautam Gambhir: गौतम गंभीर स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जातो. त्याने आपल्या स्वभावानुसार परखड भाष्य केलय.

Gautam Gambhir: खराब फॉर्ममध्ये असलेल्या KL Rahul बद्दल गंभीर स्पष्टच बोलला
Gautam gambhir-KL RahulImage Credit source: AFP
Follow us
| Updated on: Dec 29, 2022 | 7:09 PM

नवी दिल्ली: टीम इंडियाचा स्टार फलंदाज केएल राहुल सध्या खराब फॉर्मचा सामना करतोय. मागच्या काही महिन्यांपासून तो सातत्यूपर्ण कामगिरी करु शकलेला नाही. केएल राहुल टीम इंडियाचा उपकर्णधार होता. पण त्याचा परफॉर्मन्स पाहून त्याला उपकर्णधार पदावरुन हटवण्यात आलय. टी 20 वर्ल्ड कपमध्येही केएल राहुलने निराश केलं. आता बांग्लादेश विरुद्धच्या दोन सीरीजमध्ये टीम इंडियाने त्याच्या नेतृत्वाखाली विजय मिळवला. पण त्याची कामगिरी फारशी चांगली नव्हती. श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सीरीजसाठी त्याच्याजागी हार्दिक पंड्याची उपकर्णधारपदी निवड करण्यात आलीय. श्रीलंकेविरुद्धच्या टी 20 सीरीजसाठी निवडण्यात आलेल्या टीममध्ये राहुलला स्थान मिळालेलं नाही.

लखनौच्या टीममध्ये दोघे एकत्र

नुकत्याच बांग्लादेश विरुद्ध संपलेल्या कसोटी मालिकेत चार इनिंगमध्ये त्याने 22, 23, 10 आणि 2 धावा केल्या. टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याने केएल राहुलच्या फॉर्मवर स्पष्ट शब्दात भाष्य केलय. लखनौ सुपर जायंट्स टीममध्ये गौतम गंभीर आणि केएल राहुल एकत्र आहेत. गंभीर या टीमचा मार्गदर्शक आहे. केएल राहुल लखनौ सुपर जायंट्सचा कॅप्टन आहे.

गौतम गंभीर काय म्हणाला?

“तुमच्या हातात जे आहे, त्यावरच तुम्ही नियंत्रण ठेवू शकता. तुम्ही सिलेक्टर्सवर नियंत्रण ठेवू शकत नाही. पुढच्या सीरीजमध्ये काय होणार? ते तुमच्या हातात नाहीय. श्रीलंकेविरुद्ध तीन वनडेमध्ये तुला संधी मिळाली आहे. तिथे चांगला खेळ दाखवं, ते तुझ्या हातात आहे. जे तुझ्या हातात नाही, त्याचा विचार करायला सुरुवात केली की, तुम्ही विनाकारण तुमच्यावरील दबाव वाढवता” असं गंभीर स्टार स्पोर्ट्सवरील कार्यक्रमात म्हणाला. नाव किंवा टॅलेंटने भागणार नाही

“तू धावा केल्या नाहीस, तर दुसरा कोणीतरी तुझी जागा घेईल. हे फक्त संजू किंवा केएल राहुलसोबतच घडणार नाही, तर विराट, रोहित सोबत सुद्धा हे हे होऊ शकतं. त्यांनी परफॉर्मन्स केला नाही, तर टीममधील त्यांच्या स्थानाबद्दल प्रश्न विचारले जाणार. हेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट आहे. कोणीही यातून सुटणार नाही. तुला तीन वनडे सामने मिळालेत. मीडल ऑर्डरमध्ये खेळताना धावा बनव. परफॉर्मन्स असेल, तर टीममध्ये राहशील. नाव किंवा टॅलेंटने भागणार नाही” असं गौतम गंभीर म्हणाला.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.