IPL 2022, GT vs MI, Kieron Pollard : तू पुढच्या वर्षी गुजरातला येऊ शकतो, हार्दिक पांड्या आणि किरॉन पोलार्डच्या मजेशीर गप्पा
गुणतालिकेच्या विरुद्ध टोकांवर असलेल्या गुजरात आणि मुंबई संघांची ही लढाई असेल. कारण गुजरात आयपीएल 2022 च्या प्लेऑफमध्ये त्यांचे स्थान निश्चित करण्यापासून एक विजय दूर आहे.
मुंबई : आयपीएलमध्ये (IPL 2022) हार्दिकनं (Hardik Pandya) मुंबई इंडियन्ससोबत (MI) 7 सीजन खेळले आहेत. त्या सातही सीजनमध्ये चांगल्या खेळी बरोबरच मुंबई इंडियन्सने 4 जेतेपद पटकावले आहे. त्याच कारणंही तसंच आहे. अष्टपैलू खेळाडू हार्दिकने मुंबई इंडियन्ससाठी 1476 धावा केल्या आणि 42 बळी घेतले आहेत. तो रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील विजेत्या संघाचा अविभाज्य सदस्य राहिलाय. मात्र, हार्दिकची आज पहिल्यांदाच मुंबई इंडियन्सविरुद्ध लढत होणार आहे. गुणतालिकेच्या विरुद्ध टोकांवर असलेल्या गुजरात आणि मुंबई संघांची ही लढाई असेल. कारण गुजरात आयपीएल 2022 च्या प्लेऑफमध्ये त्यांचे स्थान निश्चित करण्यापासून एक विजय दूर आहे. दुसरीकडे मुंबई 9 सामन्यांत फक्त 1 विजय मिळवून प्लेऑफ स्पर्धेबाहेर आहे. त्यामुळे आजचा सामना क्रिकेटप्रेमींसाठी रंजक असणार आहे.
हार्दिकच्या किरॉन पोलार्डसोबत गप्पा
संघर्षावर बोलताना हार्दिकने मुंबई इंडियन्ससोबतच्या त्याच्या काही प्रेमळ आठवणींना उजाळा दिलाय. 2015 मध्ये चेपॉक येथे चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या खेळीनं त्याला लोकप्रियता दिली. काही दिवसांपूर्वी हार्दिकने वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार किरॉन पोलार्डशी (kieron pollard) गप्पा मारल्या होत्या आणि त्याला शुभेच्छा दिल्या होत्या. गुजरात टायटन्सच्या कर्णधार असलेल्या हार्दिकने असंही सांगितलंय की वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार पुढील वर्षी त्याच्या फ्रेंचायझीसाठी खेळू शकतो. हार्दिक म्हणाला, “मी स्वतःला नेहमी निळ्या आणि सोनेरी रंगात पाहिलंय. पण मी माझ्या राज्यासह निळ्या आणि सोनेरी रंगात देखील आहे. जे आणखी काही खास आहे. मला सीएसकेविरुद्ध यशाची पहिली झलक मिळाली जिथे मी तीन धावा केल्या. जेव्हा आम्हाला 2 षटकात 32 धावा हव्या होत्या. माझ्या सर्व आठवणी त्या संघासोबत राहिल्या आहेत,” हार्दिकनं असं गुजरात टायटन्सनं शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटलंय.
गुजरात टायटन्सनं शेअर केलेला व्हिडीओ
A tale of two colours – blue and golden – in the words of #PapaPandya ?
? Captain relives his MI memories before the clash of the day #GTvMI@hardikpandya7 #SeasonOfFirsts #AavaDe pic.twitter.com/4ZNe7Gh69v
— Gujarat Titans (@gujarat_titans) May 6, 2022
‘मला आशा आहे आम्ही जिंकू’
पुढे हार्दिक म्हणतो, ‘मला इच्छा आहे की पोलार्डसाठी सर्वोत्तम दिवस असेल पण मला आशा आहे की आम्ही जिंकू. मी काही दिवसांपूर्वी पॉलीला संदेश दिलाय. आम्ही त्याला इथे मिस करतो. गमतीने मी म्हणाले की ‘तुला माहीत नाही की पुढच्या वर्षी तू आमच्याकडे येशील, ही माझी इच्छा आहे पण मला माहीत आहे की ते कधीच होणार नाही.’ असं हार्दिक गुजरात टायटन्सनं शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटलंय. गेल्या महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या किरॉन पोलार्ड या बिग हिटिंग स्टारने 5 वेळा चॅम्पियनसाठी 9 सामन्यांमध्ये 20 पेक्षा कमी सरासरीने फक्त 125 धावा केल्या आहेत.