Virat Kohli Test Captaincy: ‘तू माझा सुपरहिरो आहेस…’ विराटच्या राजीनाम्यानंतर मोहम्मद सिराज भावूक

दक्षिण आफ्रिकेविरुद्धची तिसरी कसोटी संपल्यानंतर विराट कोहलीने भारताच्या कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाचा 1-2 असा पराभव झाला. यानंतर कोहलीने सोशल मीडियावर आपला निर्णय जाहीर केला.

Virat Kohli Test Captaincy: 'तू माझा सुपरहिरो आहेस...' विराटच्या राजीनाम्यानंतर मोहम्मद सिराज भावूक
Virat Kohli, Mohammed Siraj (Photo : Instagram mohammedsirajofficial)
Follow us
| Updated on: Jan 18, 2022 | 11:30 AM

Virat Kohli Test Captaincy: दक्षिण आफ्रिकेविरुद्धची तिसरी कसोटी संपल्यानंतर विराट कोहलीने भारताच्या कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाचा 1-2 असा पराभव झाला. यानंतर कोहलीने सोशल मीडियावर आपला निर्णय जाहीर केला.

33 वर्षीय विराट कोहली म्हणाला होता की, तो जेव्हाही मैदानावर आला आहे, तेव्हा त्याने प्रामाणिकपणे आपले काम केले आहे. कोहली म्हणाला की, त्याने संघासाठी सर्वोत्तम कामगिरी केली आहे. भारतीय कसोटी संघाचा कर्णधार म्हणून संपूर्ण कार्यकाळात त्याला पाठिंबा दिल्याबद्दल कोहलीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि त्याच्या सहकाऱ्यांचे आभार मानले.

कोहलीने लिहिले होते की, ‘मी पूर्ण प्रामाणिकपणे काम केले आहे आणि कुठेही कमी पडणार नाही याची काळजी घेण्याचा प्रयत्न केला आहे. मला इतके दिवस माझ्या देशाचे नेतृत्व करण्याची संधी दिल्याबद्दल मी बीसीसीआयचे आभार मानू इच्छितो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्या सर्व सहकाऱ्यांचे आभार मानायचे आहेत ज्यांनी पहिल्या दिवसापासून संघासाठी माझे स्वप्न पाहिले आणि कोणत्याही परिस्थितीत कधीही हार मानली नाही.

दरम्यान, भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने कोहलीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. कोहली हा आपला सुपरहिरो आहे आणि गेल्या काही वर्षांत मिळालेल्या पाठिंब्याबद्दल तो कोहलीचा आभारी आहे, असे सिराजने सांगितले. तसेच सिराजने कोहलीचे त्याच्यावर आणि त्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवल्याबद्दल आभार मानले. वेगवान गोलंदाज सिराज म्हणाला की, कोहली नेहमीच माझा कर्णधार असेल.

मोहम्मद सिराजने इंस्टाग्रामवर लिहिले आहे की, ‘माझा सुपरहिरो, तुझ्याकडून मिळालेल्या समर्थन आणि प्रोत्साहनाबद्दल मी पुरेशी कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही. तू नेहमीच माझा मोठा भाऊ आहेस. इतकी वर्षे माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल धन्यवाद. माझ्या वाईटात चांगले पाहण्यासाठी धन्यवाद. तू नेहमीच माझा कर्णधार किंग कोहली राहशील.

19 जानेवारी रोजी पार्ल येथील बोलंड पार्क येथे तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात भारत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळेल, तेव्हा विराट कोहली मैदानावर खेळताना दिसणार आहे.

इतर बातम्या

Rahul Dravid: राहुल द्रविड कोच झाल्यामुळे टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या? जसप्रीत बुमराह म्हणाला…

IPL 2022 ला आणखी एक झटका, इंग्लंडच्या एक मोठ्या ऑलराऊंडर प्लेयरने घेतली माघार

Vinod Kambli: वर्तनामुळे क्रिकेटमधल्या वाया गेलेल्या टॅलेंटची गोष्ट, मैदानापेक्षा बाहेरच्या गोष्टींचीच जास्त चर्चा

(You Will Always Be My Captain, Mohammed Siraj Writes A Heartfelt Note For Virat Kohli after his Resign)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.