Yuvraj Singh | ‘माझी टीमला गरज, मला… ‘; BCCI ने जे बोलायलं हवं ते युवराज स्वत: बोलला!

Yuvraj Singh on Team India : टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि सिक्सर किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युवराज सिंह यान मोठं वक्तव्य केलं आहे. टीम इंडिया मोठ्या स्पर्धांमध्ये महत्त्वाच्या सामन्यात का पराभूत होते यावर बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे.

Yuvraj Singh | 'माझी टीमला गरज, मला... '; BCCI ने जे बोलायलं हवं ते युवराज स्वत: बोलला!
Follow us
| Updated on: Jan 14, 2024 | 7:10 PM

मुंबई : टीम इंडियाचा स्टार खेळाडू युवराज सिंह सर्वांनाच माहित आहे. टीम इंडियाला दोन्ही वर्ल्ड कप जिंकून देताना योद्ध्यासारखं खेळताना युवराजला संपूर्ण क्रिकेट जगताने पाहिलं आहे. युवराज सिंहचे सलग सहा सिक्स कोणीच विसरू शकत नाही. त्यासोबतच 2011 च्या सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळलेली जिगरबाज खेळीसुद्धा शानदार होती. 2013 नंतर टीम इंडियाला एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नाही. याच पार्श्वभूमीवर बोलताना युवराज सिंहने स्वत: पुढाकार घेत टीमच्या हितासाठी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाला युवराज?

मला वाटतं की आपण अनेक फायनल खेळल्या आहेत. पण एकही आतापर्यंत जिंकू शकलेलो नाही. 2017 मध्ये मी सुद्धा एका फायनलमध्ये संघामध्ये होतो त्यावेळी आम्ही पाकिस्तानकडून पराभूत झालो होतो. येत्या वर्षांमध्ये यावर काम करावं लागणार आहे. काहीतरी चुकत आहे कारण मोठ्या मॅचमध्ये शारीरिकदृष्ट्या तयार असतो पण मानसिकदृष्ट्या तयार असण गरजेचं असल्याचं युवराज सिंह याने म्हटलं आहे.

युवा खेळाडूंना दबावामध्ये कसं खेळायचं आणि मॅचविनिंग खेळी कशी करायची हे शिकवणं गरजेचं आहे. टीममध्ये मोजकेच खेळाडू असे आहेत की जे दबावामध्ये कशा प्रकारे खेळायचं हे माहित आहे. पण हे एक ते दोन नाहीतर सगळ्या खेळाडूंना जमायल हवं. मला यासंदर्भात टीम इंडियाला मार्गदर्शन करायला आवडेल. मी कमबॅक करायची इच्छा आहे. युवा खेळाडूंना मार्गदर्शन करेल, मला विश्वास आहे की मध्या फळीत म्हणजे मिडल ऑर्डरमध्ये कसं खेळायचं याबद्दल मी चांगलं योगदान देईल असं मला वाटत असल्याचं युवराज म्हणाला.

दरम्यान, टीम इंडियाने 2013 नंतर एकदी आयसीसीची ट्रॉफी जिंकली नाही. टीम इंडियाची आता चोकर्ससारखी अवस्था झाली आहे. कारण फायनल आणि सेमी फायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव होत आहे. त्यामुळे खेळाडू दबावात खेळत असं बोललं जात होतं. मात्र 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा फायनलमध्ये पराभव झाला त्यावेळी हे सिद्ध झालं की टीम इंडिया मोठ्या सामन्यांचा दबाव घेते. युवराज सिंह स्वत: बोलत असेल की मार्गदर्शन करायला मी तयार आहे. तर बीसीसीआयने याचा विचार करायला हवा.

99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.