युवराज सिंगने कोहलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत मागितली अशी गोष्ट, विराट पूर्ण करणार का मागणी?

विराट कोहलीने वयाची 36 वर्षे पूर्ण केली आहे. यावेळी जगभरातून कोट्यवधी चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. माजी क्रिकेटपटू युवराज सिंग यानेही शुभेच्छा देत विराटकडे एक खास गोष्ट मागितली आहे. आता विराट ही मागणी पूर्ण करतो का? याकडे लक्ष लागून आहे.

युवराज सिंगने कोहलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत मागितली अशी गोष्ट, विराट पूर्ण करणार का मागणी?
Follow us
| Updated on: Nov 05, 2024 | 4:06 PM

रनमशिन्स म्हणून ख्याती असलेल्या विराट कोहलीचा 36 वा वाढदिवस आहे. 5 नोव्हेंबर 2024 रोजी विराट कोहलीने आपल्या वयाची 36 वर्षे पूर्ण केली आहेत. त्यामुळे त्याला जगभरातील चाहते आणि शुभचिंतकांकडून शुभेच्छा मिळत आहेत. खरं तर ज्याचा वाढदिवस असतो त्याला गिफ्ट मिळतं. पण या उलट एक चित्र पाहायला मिळतंय.माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने विराट कोहलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिला आणि एक मागणीही टाकून दिली. विराट कोहली सध्या खराब फॉर्ममधून प्रवास करत आहे. न्यूझीलंड विरूद्धच्या दौऱ्यात त्याच्या पदरी निराशा पडली. त्याच्या फॉर्म हा चिंतेचा विषय असताना युवराज सिंगने मोठी मागणी केली आहे. युवराज सिंगने वाढदिवसाच्या शुभेच्छा देत फॉर्म आणि एक मोठी इनिंगची मागणी केली. युवराज सिंगने सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिलं की, ‘वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, किंग कोहली. निराशेनंतरच आशा निर्माण होते. संपूर्ण जग तुमच्याकडे त्याच आशेने पाहत आहे. तू याआधीही अशा अपेक्षा पूर्ण केल्या आहेत आणि या वेळीही तू तेच करशील याची मला खात्री आहे. खूप प्रेम.’

युवराज सिंगने आपल्या पोस्टमध्ये तसं काही स्पष्ट लिहिलेलं नाही. पण सध्या विराट कोहलीचा फॉर्म चिंतेचा विषय ठरला आहे. विराट कोहलीने फॉर्मात परतावे आणि मोठी खेळावी. तसेच जगभरातील चाहत्यांनी इच्छा पूर्ण करावी असा त्यातून अर्थ निघत आहे. न्यूझीलंडविरुद्ध विराट कोहलीची बॅट शांत होती. आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. विराट कोहली या चमूत आहे. विराट कोहली आता ऑस्ट्रेलिया दौऱ्याची तयारी करत आहे.

युवराज सिंगसह अनेक दिग्गज खेळाडूंनी विराट कोहलीला शुभेच्छा दिल्या आहेत. माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्या दिवशी वाटलं होतं की हा मुलगा काही वेगळं करते, असं आकाश चोप्रा म्हणाला. तर एस. बद्रीनाथने लिहिलं की, चीकू ते GOAT प्रवास. तुझ्या शैलीने भारताच्या क्रिकेट खेळण्याची स्टाईल बदलली. सुरेश रैनाने लिहिलं की, विराटच्या चांगल्या भविष्यासाठी प्रार्थना.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.