IPL 2022: विराटच्या RCB ने युजवेंद्रला कसं ‘फसवलं’, स्वत: चहलनेच सांगतिली पडद्यामागची Inside Story

आयपीएलच्या (IPL) 15 व्या सीजनमध्ये युजवेंद्र चहल राजस्थान रॉयल्ससाठी खेळताना दिसणार आहे. लेग स्पिनर युजवेंद्र चहलला राजस्थानच्या संघाने 6.5 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं. चहल याआधी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा (Royal Challengers Bangalore) भाग होता.

IPL 2022: विराटच्या RCB ने युजवेंद्रला कसं 'फसवलं', स्वत: चहलनेच सांगतिली पडद्यामागची Inside Story
पर्पल कॅपच्या यादीत पहिल्या क्रमांकावर युझवेंद्र चहल आहे.Image Credit source: BCCI/IPL
Follow us
| Updated on: Mar 11, 2022 | 7:43 AM

नवी दिल्ली: आयपीएलच्या (IPL) 15 व्या सीजनमध्ये युजवेंद्र चहल राजस्थान रॉयल्ससाठी खेळताना दिसणार आहे. लेग स्पिनर युजवेंद्र चहलला राजस्थानच्या संघाने 6.5 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं. चहल याआधी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा (Royal Challengers Bangalore) भाग होता. त्याने या संघासाठी खूप चांगलं प्रदर्शन केलं आहे. चहल RCB साठी सर्वात मोठ्या मॅचविनर पैकी एक आहे. पण तरीही आरसीबीने त्याला रिटेन केलं नाही. टीमने ज्यावेळी रिटेन खेळाडूंची यादी जाहीर केली, त्यात चहलचं नाव नव्हतं. युजवेंद्र चहलने स्वत:च रिटेन होण्यासाठी नकार दिला, वैगेर अशा बातम्या त्यानंतर आल्या. पण सत्य आता समोर आलं आहे. आरसीबीला मला कधीच रिटेन करायचं नव्हतं असं चहलने म्हटलं आहे. सोशल मीडियावर त्याला भरपूर सुनावण्यातही आलं. “आरसीबीचे क्रिकेट डायरेक्टर माइक हेसन यांचा मला फोन आला होता. त्यांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची नाव मला सांगितली. हेसन यांनी ऑक्शनमध्ये आपल्यावर बोली लावण्याचं आश्वासनही दिलं होतं” असं युजवेंद्र चहलने क्रीडा पत्रकार रवीश बिष्ट यांच्याशी बोलताना सांगितलं.

युजवेंद्र चहलने सांगितलं पडद्यामागे काय घडलं

“आयपीएल रिटेंशनच्यावेळी मी RCB कडे एकही पैसा मागितला नव्हता. युजवेंद्र चहलने 10 ते 12 कोटी रुपयांची मागणी केली, असं बोललं जातं. पण यात अजिबात तथ्य नाहीय. मला माइक हेसन यांचा फोन आला होता व त्यांनी रिटेन केलेल्या तीन खेळाडूंची नाव मला सांगितली. ऑक्शनमध्ये माझ्यावर बोली लावणार असही त्यांनी आपल्याला आश्वासन दिलं होतं. दोन नव्या टीम्ससाठी ड्राफ्ट खेळाडू म्हणून मी जाईन अशी त्यांना भिती होती. पण मी त्या संघांकडून खेळणार नाही, असं त्यांना आश्वासन दिलं होतं. मला 100 टक्के आरसीबीकडूनच खेळायचं होतं” असं युजवेंद्र चहलने सांगितलं.

सोशल मीडियावर मला शिव्या घातल्या

“सोशल मीडियावर मला ट्रोल करण्यात आलं. मला शिव्या घातल्या. आरसीबीने युजवेंद्र चहलला इतक सगळं दिलं पण त्याला रिटेन व्हायच नाहीय असं सगळेजण म्हणत होते. पण सत्य हे आहे की, मला आरसीबीने काही सांगितलचं नाही. त्यांनी फक्त मला रिटेन केलेल्या तीन खेळाडूंची नाव सांगितली आणि ऑक्शनमध्ये खरेदी करण्याचं आश्वासन दिलं” अशी माहिती चहलने दिली.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.