IPL 2022 Purple Cap Winner: अखेर Yuzvendra Chahal ठरला पर्पल कॅपचा मानकरी
IPL 2022 Final Purple Cap Holder: क्वालिफायर 2 च्या सामन्यात युजवेंद्र चहलला एकही विकेट मिळाला नाही. त्याचवेळी हसरंगाने राजस्थानचा कॅप्टन सॅमसनला आऊट करुन चहलची बरोबरी केली होती.
मुंबई: इंडियन प्रिमीयर लीग (IPL) स्पर्धेतला यंदाच्या सीजनमधला आज शेवटचा सामना खेळला गेला. गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स (GT vs RR) या दोन संघांमध्ये फायनल सुरु आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये ही फायनल लढत सुरु आहे. आयपीएल स्पर्धेत कुठला संघ चॅम्पियन ठरणार? त्या बरोबरच ऑरेंज कॅप, पर्पल कॅप कोणत्या खेळाडूला मिळणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असते. यंदाच्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा युजवेंद्र चहल (Yuzvendra chahal) पर्पल कॅपचा मानकरी ठरला. त्याने आयपीएलच्या 15 व्या सीजनमध्ये सर्वाधिक विकेट घेतल्या. त्याने आपल्या गोलंदाजीने सर्व प्रेक्षकांची मन जिंकून घेतली. आज फायनल सामन्याला सुरुवात होण्याआधी युजवेंद्र चहल आणि रॉयल चॅलेंजर्ल बँगलोरच्या वानिंन्दु हसरंगा यांचे समसमान विकेटस होत्या. चहलपेक्षा हसरंगाचा गोलंदाजीचा इकोनॉमी रेट चांगला होता. चहलचा इकोनॉमी रेट (7.92) आणि हसरंगाचा (7.92) आहे. त्यामुळे हसरंगा आघाडीवर होता. पण आज फायनल मॅचमध्ये चहलने गुजरातचा कॅप्टन हार्दिक पंड्याचा विकेट काढून पर्पल कॅप मिळवली. युजवेंद्र चहलने एका अप्रतिम चेंडूवर कॅप्टन हार्दिक पंड्याला स्लीपमध्ये यशस्वी जैस्वालकरवी झेलबाद केलं. चहलच्या आता 27 विकेट झाल्यात.
चहलला एकही विकेट मिळाली नव्हती
क्वालिफायर 2 च्या सामन्यात युजवेंद्र चहलला एकही विकेट मिळाला नाही. त्याचवेळी हसरंगाने राजस्थानचा कॅप्टन सॅमसनला आऊट करुन चहलची बरोबरी केली. चहलकडे आज पर्पल कॅप परत मिळवण्याची आणखी एक संधी होती. ती चहलने साधली.
हॅट्ट्रिक घेणारा गोलंदाज
यंदाच्या सीजनमध्ये पर्पल कॅपसाठी फिरकी गोलंदाजांमध्येच स्पर्धा दिसून आली आहे. आधी कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहलमध्ये स्पर्धा होती. त्यानंतर श्रीलंकेचा फिरकी गोलंदाजा वानिंन्दु हसरंगा यामध्ये आला. त्यानंतर हसरंगा आणि चहलमध्ये स्पर्धा सुरु झाली. युजवेंद्र चहलने या सीजनमध्ये जबरदस्त गोलंदाजी केलीय. त्याने गरज असताना संघाला विकेट मिळवून दिल्यात. लीग स्टेजमध्ये केकेआर विरुद्ध, तर त्याने हॅट्ट्रिक घेतली. 18 धावात पाच विकेट ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी आहे.
पर्पल कॅपच्या शर्यतीत 23 विकेटसह कागिसो रबाडा तिसऱ्या स्थानावर आहे. उमरान मलिक 22 विकेटसह चौथ्या आणि कुलदीप यादव 21 विकेटसह पाचव्या स्थानावर आहे. पण रबाडाचा पंजाब, उमरान मलिकचा हैदराबाद आणि कुलदीपचा दिल्ली कॅपिटल्स संघ स्पर्धेबाहेर गेला आहे.