Yuzvendra Chahal IPL 2022: दारुच्या नशेत क्रिकेटपटूने मला 15 व्या मजल्याच्या बाल्कनीत लटकवलं, चहलने सांगितला भयानक अनुभव
Yuzvendra Chahal IPL 2022: राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) आयपीएल सामन्यानंतर त्याच्यासोबत घडलेल्या एक धक्कादायक प्रसंग सांगितला.
मुंबई: राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) आयपीएल सामन्यानंतर त्याच्यासोबत घडलेल्या एक धक्कादायक प्रसंग सांगितला. 2013 साली इंडियन प्रिमीयर लीगच्या सामन्यानंतर एका पार्टीत युजवेंद्र चहलला हा भयानक अनुभव आला होता. एका क्रिकेटपटूनेच चहलला घाबरवलं होतं. “मी मृत्यूला जवळून पाहिलं. त्या रात्री मी खूप महत्त्वाचा धडा शिकलो” असं चहल त्या अनुभवाबद्दल बोलताना म्हणाला. युजवेंद्र चहल 2013 साली मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) खेळायचा. “बँगळुरुमध्ये सामना संपल्यानंतर पार्टी सुरु होती. त्यावेळी दारुच्या नशेत असलेल्या एका खेळाडूने मला बोलावलं व मला 15 व्या मजल्याच्या बाल्कनीमध्ये लटकवलं. इतरांनी ज्यावेळी हा प्रकार पाहिला. त्यावेळी त्यांनी माझी सुटका केली. या सर्व प्रकारानंतर मला चक्कर आल्यासारखं झालं” असं युजवेंद्रने सांगितलं.
त्या खेळाडूचं नाव काय?
कुठल्या खेळाडूने चहलसोबत हा प्रकार केला, त्याचं नाव त्याने उघड केलं नाही. फक्त मी यातून योग्य तो बोध घेतला, एवढच त्याने सांगितलं. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडून खेळण्याआधी चहल मुंबई इंडियन्सकडून खेळायचा. त्यावेळी त्याची बेस प्राइस 10 लाख रुपये होती. चहल RCB चा अविभाज्य भाग समजला जायचा. पण या 2021 मध्ये आरसीबीने त्याला रिलीज केलं. चहल आता राजस्थान रॉयल्ससाठी खेळतो.
आता सगळ्यांना समजेल
आर. अश्विनसोबत बोलताना चहलने त्याच्यासोबत 2013 साली घडलेला हा किस्सा सांगितला. राजस्थान रॉयल्सने हा व्हिडिओ शेअर केला आहे. “अजूनपर्यंत मी कोणाला बोललो नव्हतो. पण आता सगळ्यांना समजेल” असं चहल म्हणाला.
एक खेळाडू प्रचंड दारु प्याल्यामुळे नशेत होता
“2013 साली मी मुंबई इंडियन्सकडून खेळायचो. बँगलोरमध्ये आमची मॅच होती. सामन्यानंतर एक गेट-टुगेदर होतं. एक खेळाडू प्रचंड दारु प्याल्यामुळे नशेत होता. मी त्याचं नाव घेणार नाही. तो बऱ्याच वेळापासून माझ्याकडे पहात होता. त्याने मला बोलावलं. तो मला बाहेर घेऊन गेला व बाल्कनीमध्ये त्याने मला लटकवलं” असं चहलने सांगितलं.
View this post on Instagram
एक छोटीशी चूक जरी झाली असती, तर मी…
“माझे हात त्याच्या गळ्यामध्ये होते. माझी ग्रीप सुटली असती, तर 15 व्या मजल्यावर मी खाली पडलो असतो. त्यावेळी तिथे काही लोक होते. ते मदतीसाठी धावले. या सर्व प्रकारानंतर मला चक्कर आल्यासारखं झालं. त्यांनी मला पाणी दिलं” असं चहल म्हणाला. “त्यावेळी मला आपण बाहेर जातो, तेव्हा किती जबाबदार असलं पाहिजे, हे कळलं. एक छोटीशी चूक जरी झाली असती, तर मी 15 व्या मजल्यावरुन खाली पडलो असतो, असं चहलने सांगितलं.