Rohit Sharma | ‘मुंबई इंडियन्स’मध्ये ‘त्या’ दोन खेळाडूंना परत आणू इच्छितो : रोहित शर्मा
रोहितच्या चाहत्यांनी त्याला अनेक रंजक प्रश्न विचारले आणि रोहितने त्या सर्व प्रश्नांची दिलखुलास उत्तरं दिली.
मुबंई : हिटमॅन रोहित शर्मा हा आयपीएलचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे (Cricketer Rohit Sharma). त्याच्या नेतृत्त्वात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) चारवेळा आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचा मान मिळवला आहे. यापैकी दोन सामने केवळ एक धावेच्या फरकाने जिंकले होते. त्यामुळे एक कर्णधार म्हणून रोहित शर्मा यशस्वी ठरला, असं म्हटलं जातं. नुकतंच रोहित शर्माने सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांशी संवाद साधला (Cricketer Rohit Sharma).
यावेळी रोहितच्या चाहत्यांनी त्याला अनेक रंजक प्रश्न विचारले आणि रोहितने त्या सर्व प्रश्नांची दिलखुलास उत्तरं दिली. एका चाहत्याने रोहितला विचारले, ‘जर संधी मिळाली तर निवृत्ती घेतलेल्या कुठल्या खेळाडूंना मुंबईच्या संघात परत घेशील?’ यावर रोहितने सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि शॉन पोलॉक (Shaun Pollock) या खेळाडूंना संघात परत घेण्याची इच्छा असल्याचं सांगितलं.
Q: Which youngster impresses you the most with his batting in Indian Team ? #AskRo – @hitman_ka_fan
— Rohit Sharma (@ImRo45) August 2, 2020
रोहित शर्माचा 2019 विश्वचषकमधील सर्वात आवडतं शतक कुठलं?
रोहितच्या एका चाहत्याने त्याला विचारले, 2019 विश्वचषकातील त्याचं सर्वात आवडतं शतक कुठलं आहे? त्यावर रोहित शर्माने उत्तर दिलं की, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातील शतक त्याचं आवडतं शतक आहे. या सामन्यात रोहितने 122 धावा केल्या होत्या. 2019 च्या विश्व चषक स्पर्धेत रोहितने एकूण 5 शतकं ठोकली होते.
रोहित शर्माने सांगितलेला तो सामना 5 जूनला झाला होता. यामध्ये दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर 228 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. रोहितने त्या सामन्यात 144 चेंडूत 122 धावा केल्या होत्या. यामध्ये 13 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. रोहितच्या धुवाधार 122 धावांमुळे भारताने तो सामना 6 विकेट्सने जिंकला होता. या सामन्यात रोहित शर्माला ‘मॅन ऑफ द मॅच’ने गौरवण्यात आलं होतं (Cricketer Rohit Sharma).
आयपीएल 2020 ची घोषणा
बीसीसीआयने आयपीएल 2020 ची घोषणा केली आहे. यंदाचा आयपीएल यूएईमध्ये खेळवला जाणार आहे. गेल्या अनेक काळापासून मैदानापासून दूर असलेले खेळाडू आता पुन्हा सराव सुरु करु शकतील. येत्या 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबरपर्यंत आयपीएलचे सामने खेळवले जाणार आहेत.
रोहित शर्माचा IPL रेकॉर्ड
रोहित शर्माने आतापर्यंत IPL मध्ये 188 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 31.6 च्या सरासरीने 4,898 धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि 36 अर्धशतकांचा समावेश आहे.
रोहित शर्माचा स्ट्राईक रेट 130.82 आहे. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा तिसऱ्या स्थानावर आहे. रोहितच्या आधी पहिल्या क्रमांकावर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आहे. विराटने आतापर्यंत 5,412 धावा केल्या आहेत. तर 5,368 धावांसह सुरेश रैना (Suresh Raina) दुसऱ्या क्रमांकावर आहे.
Cricketer Rohit Sharma
संबंधित बातम्या :
IPL 2020 | ‘आयपीएल 2020’ला सरकारची परवानगी, 19 सप्टेंबरला पहिला सामना, अंतिम कधी?