AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cristiano Ronaldo’s Newborn Boy Dies : हृदयद्रावक! रोनाल्डोचं नवजात बाळ दगावलं, ट्वीट करत काय म्हणाला रोनाल्डो?

Cristiano Ronaldo new born baby death: ऑक्टोबर महिन्यात रोनाल्डो आणि जॉर्जिया यांनी गोड बातमी सगळ्यांसोबत शेअर केली होती. रोनाल्डोला दुसऱ्यांना जुळी होणार होती. त्यामुळे रोनाल्डो दाम्पत्य आनंदात होतं.

Cristiano Ronaldo's Newborn Boy Dies : हृदयद्रावक! रोनाल्डोचं नवजात बाळ दगावलं, ट्वीट करत काय म्हणाला रोनाल्डो?
अत्यंत दुःखद बातमी..Image Credit source: instagram
| Updated on: Apr 19, 2022 | 12:01 PM
Share

प्रसिद्ध फुटबॉल खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोवर (Cristiano Ronaldo) दुःखाचा डोंगर कोसळलाय. रोनाल्डोच्या नवजात बाळाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे रोनाल्डो दाम्पत्य शोकाकून झालंय. रोनाल्डोनं स्वतः ट्वीट (Tweet) करत ही माहिती दिली आहे. यानंतर चाहत्यांनाही मोठा धक्का बसलाय. रोनाल्डोची प्रेसयी (Cristiano Ronaldo girl friend) असलेल्या जॉर्जियानं जुळ्या मुलांना जन्म दिला होता. त्यातील एका बाळाचा मृत्यू झाला. तर एक मुलगी सुरक्षित आहे. दरम्यान, आता ही मुलगीच आमच्या जगण्याची आशा असल्याचंही रोनाल्डोनं आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय. आमच्या वेदना फक्त आई-बाबा झाले आहेत, त्यांनाच कळू शकतात, असंही रोनाल्डोनं आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय. नवजात बाळाच्या मृत्यूमुळे आम्ही उद्ध्वस्त झालो आहोत, असंही रोनाल्डोनं म्हटलंय. रोनाल्डो आणि जॉर्जिया यांच्या कोसळलेल्या दुःखामुळे रोनाल्डोच्या चाहत्यांनी त्यांच्यासोबत जे झालं, त्याप्रती दुःख व्यक्त केलंय.

View this post on Instagram

A post shared by Cristiano Ronaldo (@cristiano)

ट्वीट मध्ये रोनाल्डो काय म्हणाला?

महान फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि जॉर्जिया यांच्या नावासह एक पत्र शेअर केलं आहे. हे पत्र ट्वीट करत रोनाल्डोनं म्हटलंय, की..

आम्ही आमच्या नवजात बाळाला गमावलंय. आम्हाला होत असलेल्या वेदाना फक्त आई-वडीलच समजू शकतात. जॉर्जियाला जुळी मुलं झाली. त्यातील मुलाला आम्ही गमावलं असून मुलगी सुखरुप आहे. आता ही मुलगची आमच्यासाठी आधार, आनंद आणि आशा आहे. डॉक्टर आणि नर्सेसनी खूप प्रयत्न केले. काळजी घेतली. आणि आम्हाला धीरही दिला. पण नवजात बाळ दगावल्यानं आम्ही उद्ध्वस्त झालोत.

ऑक्टोबर महिन्यात मिळाली गोड बातमी..

ऑक्टोबर महिन्यात रोनाल्डो आणि जॉर्जिया यांनी गोड बातमी सगळ्यांसोबत शेअर केली होती. रोनाल्डोला दुसऱ्यांना जुळी होणार होती. त्यामुळे रोनाल्डो दाम्पत्य आनंदात होतं. खास प्लान्सही या दोघांनी बाळाच्या आगमनासाठी केले होते. मात्र अनपेक्षितपणे त्यांचं एक बाळ प्रसुतीवेळी दगावलंय. डॉक्टरांनीही बाळाला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र त्यांना यश आलं नाही.

2010 साली रोनाल्डो पहिल्यांदा बाप झाला होता. त्याच्या मुलाचं नाव ख्रिस्तियानो ज्युनिअर असं ठेवण्यात आलेलं. त्यानंतर रोनाल्डोच्या आयुष्यात जुळ्या मुलांनी आनंद द्विगुणित केलेला. इव्हा आणि माटेओ असं रोनाल्डोच्या जुळ्या मुलांचं नाव आहे. दरम्यान, यानंतर रोनाल्डो आणि प्रेयसी जॉर्जिया यांनी आपल्याला पहिलं बाळ होण्याची बातमी दिली होती. 2018 मध्ये रोनाल्डो आणि जॉर्जिया यांच्या आयुष्यात अलानाची इन्ट्री झाली होती. त्यानंतर पुन्हा गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात रोनाल्डो आणि जॉर्जिया यांना जुळी होणार असल्याची बातमी समोर आली होती.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.