CWG 2022 : पॅरा टेबल टेनिसमध्ये भाविना पटेलला सुवर्ण पदक, सोनल बेन पटेलने पॅरा टेबल टेनिसमध्ये कांस्यपदक
CWG 2022 : पॅरा टेबल टेनिसमध्ये भाविना पटेलला सुवर्ण पदक, नायजेरियन खेळाडूचा 3-0 असा पराभव
मुंबई : राष्ट्रकुल स्पर्धेच्या (CWG 2022) 9 व्या दिवशीही भारतीय खेळाडूंनी चमक दाखवल्याचं पाहायला मिळालं. भारतीय कुस्तीपटूंनी प्रथम कुस्तीत आपली ताकद दाखवली. त्यानंतर आता भारताच्या भाविना पटेलने (Bhavina patel) पॅरा टेबल (Para Table) टेनिसमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. भारतीय खेळाडूने अंतिम फेरीत नायजेरियन खेळाडूचा 3-0 असा पराभव करून पॅरा टेबल टेनिसमध्ये सुवर्णपदक जिंकले. वास्तविक, या भारतीय खेळाडूने गेल्या वर्षी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये रौप्यपदक देखील मिळविले होते. राष्ट्रकुल 2022 मधील भारताचे हे 13 वे सुवर्णपदक आहे.
Inspiring ? by @BhavinaOfficial in the Women’s Singles Classes 3 – 5 Para Table Tennis giving Team?? a 1 & 3 finish in the category and the 14th medal of the day#EkIndiaTeamIndia #WeAreTeamIndia pic.twitter.com/3h85nAln14
हे सुद्धा वाचा— Team India (@WeAreTeamIndia) August 6, 2022
सोनल बेन पटेलने पॅरा टेबल टेनिसमध्ये जिंकले कांस्यपदक
त्याचवेळी, याशिवाय भारताच्या सोनल बेन पटेलने 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पॅरा टेबल टेनिसमध्ये कांस्यपदक जिंकले. तिने ब्राँझपदकाचा सामना 3-5 ने जिंकला. आत्तापर्यंत भारताने 38 पदके जिंकली आहेत. ज्यामध्ये 13 सुवर्णपदकांचा समावेश आहे. याशिवाय गेल्या वर्षी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणारी भारतीय टेबल टेनिसपटू भावना पटेल हिने सुवर्णपदक पटकावले आहे.
CWG 2022: Sonalben Patel clinches bronze in Para Table Tennis women’s singles
Read @ANI Story | https://t.co/QvDRIjR8FB #paratabletennis #CWG2022 #SonalbenPatel pic.twitter.com/43GPOJEngd
— ANI Digital (@ani_digital) August 6, 2022
भारतीय कुस्तीपटूंचा दबदबा
भारताचा स्टार कुस्तीपटू रवी कुमार दहिया याने राष्ट्रकुल स्पर्धेत प्रथमच पदक जिंकले आहे. त्याचे पहिले पदक सुवर्ण आहे. रवीने फ्रीस्टाइल 57 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत नायजेरियाच्या अबिकवेनिमो विल्सनचा 10-0 असा पराभव केला. कुस्तीतील भारताचे हे चौथे सुवर्णपदक आहे. याशिवाय भारताची ज्येष्ठ कुस्तीपटू विनेश फोगटने तिसऱ्यांदा राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. तिने ५३ किलो फ्रीस्टाइलमध्ये श्रीलंकेच्या चामोदय केशानीचा पराभव केला. विनेशने हा सामना 4-0 ने जिंकला. तिने 2014 ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्समध्ये 48 किलो आणि 2018 कॉमनवेल्थ गेम्समध्ये 50 किलो गटात सुवर्णपदक जिंकले.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.