…म्हणून धोनी ‘बीसीसीआय’च्या वार्षिक करारासाठी अपात्र
ए प्लस करारबद्ध यादीत कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा आणि गोलंदाज जसप्रीत बुमराहचा समावेश आहे.
मुंबई : ‘बीसीसीआय’च्या वार्षिक कराराच्या यादीत समाविष्ट केलं जाणार नसल्याची कल्पना टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनी याला दिली होती, अशी माहिती ‘बीसीसीआय’मधील सूत्रांनी (Dhoni uneligible for BCCI Contract ) दिली आहे. भारतीय खेळाडूंच्या वार्षिक कराराची यादी जाहीर करताना धोनीचं नाव वगळल्याने सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे.
बीसीसीआयच्या करारासाठी पात्र ठरण्यासाठी खेळाडूला प्रत्येक मोसमात किमान तीन टी20 सामने खेळणं अनिवार्य असतं. त्यामुळे ऑक्टोबर 2019 ते सप्टेंबर 2020 या काळासाठी करण्यात आलेल्या करारबद्ध खेळाडूंच्या यादीत महेंद्रसिंह धोनीचं नाव नाही.
ए प्लस करारबद्ध यादीत कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा आणि गोलंदाज जसप्रीत बुमराहचा समावेश आहे. ए प्लस, ए, बी आणि सी अशा चार श्रेणीत भारतीय खेळाडूंशी करार करण्यात येतो. मात्र धोनीचं नाव या कोणत्याच श्रेणीत नाही.
Sources: MS Dhoni was informed that he won’t be given BCCI’s central contact, before the decision was announced today. A player needs to play a minimum of three T20 matches in a particular season to be eligible for BCCI central contract. pic.twitter.com/FHYfvA1PEc
— ANI (@ANI) January 16, 2020
नवदीप सैनी, मयांक अग्रवाल, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर या युवा क्रिकेटपटूंचा वार्षिक करार यादीत समावेश करण्यात आला आहे.
कोणाला किती रक्कम मिळणार ए+ ग्रेड – 7 कोटी ए ग्रेड – 5 कोटी बी ग्रेड – 3 कोटी सी ग्रेड – 1 कोटी
ए + ग्रेड – विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह
ए ग्रेड – रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, लोकेश राहुल, शिखर धवन, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, कुलदीप यादव, रिषभ पंत
बी ग्रेड – वृद्धीमान साहा, उमेश यादव, युजवेंद्र चहल, हार्दिक पांड्या, मयांक अग्रवाल
सी ग्रेड – केदार जाधव, नवदीप सैनी, दीपक चहर, मनिष पांडे, हनुमा विहारी, शार्दूल ठाकूर, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर