17 वर्षांची असताना भारताविरोधात पदार्पण, धोनीसारखं शार्प डोकं, टॉपलेस फोटो टाकून उडवला धुराळा!
सारा एकदमच चर्चेत आली जेव्हा तिने 2019 मध्ये तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचा टॉपलेस फोटो शेअर केला. या फोटोने अनेकांनी तोंडात बोटं घातली. (England Women Cricketer Sarah Taylor birthday Today)
मुंबई : वयाच्या 17 व्या वर्षी तिने भारताविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पुढच्याच वर्षी तिने चेन्नईत धमाकेदार शकत ठोकलं. 2009 मध्ये एकदिवसीय आणि टी -20 विश्वचषक जिंकणार्या संघाची ती सदस्य राहिली. 2016 मध्ये, वयाच्या 26 व्या वर्षी तिने क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी ब्रेक घेतला. एक वर्षानंतर क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं आणि आपल्या माय भूमीवर विश्वचषक जिंकला. यानंतर, 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा तिने निरोप घेतला. केवळ एवढंच नाही तर आणखी दोन कारणांमुळे ती चर्चेत आली. एक- जे काम धोनीलाही जमलं नाही ते काम तिने वयाच्या 29 व्या वर्षी केलं. आणि दोन- एका अभियाना अंतर्गत टॉपलेस फोटो टाकून तिने भल्या भल्यांना तोंडात बोटं घायायला लावली. आम्ही सांगतोय इंग्लडची महिला क्रिकेटपटू सारा टेलर (Sara Taylor) हिच्याबद्दल.. आज तिचा वाढदिवस आहे, नजर टाकूयात तिच्या क्रिकेट कारकीर्दीबद्दल! (England Women Cricketer Sarah Taylor birthday Today)
20 मे 1989 साली साराचा जन्म झाला. साराने 14 ऑगस्ट 2006 ला रोजी लॉर्ड्समध्ये भारताविरुद्ध एकदिवसीय सामन्यात पदार्पण केलं. पदार्पणाच्याच सामन्यात तिने तिच्या बॅटचा तडाखा भारताला दाखवला. भारतीय बोलर्सला झोपडून काढत तिने दमदार अर्धशतक ठोकलं.पुढच्याच वर्षी भारतात येऊन दादागिरी केली. चेन्नईच्या मैदानावर तिने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. यष्टीरक्षक म्हणून तिने खास विक्रम केला की विक्रम धोनीसुद्धा करु शकला नाही.
धोनीपेक्षा जास्त स्टम्पिंग साराच्या नावावर
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी -20 क्रिकेटमध्ये सारा टेलरच्या नावावर 51 स्टम्पिंगचा विक्रम आहे. वयाच्या 29 व्या वर्षी तिने 90 सामन्यांमध्ये हा विक्रम केला. दुसरीकडे भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय टी -20 सामन्यात फक्त 34 स्टम्पिंग केले आहेत. तिच्या या विक्रमावर साराला नक्कीच अभिमान वाटत असेल.
साराची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
साराच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं तर तिने 10 कसोटी सामन्यांमध्ये 300 धावा केल्या. कसोटीत तिच्या नावावरही 18 कॅच आणि दोन स्टम्पिंग आहेत.त्याचबरोबर साराने 126 एकदिवसीय सामन्यात 38.26 च्या सरासरीने 4056 धावा केल्या, ज्यात 7 शतके आणि 20 अर्धशतकांचा समावेश आहे. एकदिवसीय फॉरमॅटमध्ये तिने विकेटकीपर म्हणून 87 कॅच आणि 51 स्टम्पिंग केल्या. याशिवाय साराने 90 टी -20 सामन्यात 29.02 च्या सरासरीने 2177 धावा केल्या. ज्यात तिने 16 अर्धशतकं ठोकली.
टॉपलेस फोटो टाकून धुराळा उडवला
तिच्या कारकीर्दीच्या ती एकदमच चर्चेत आली जेव्हा तिने 2019 मध्ये तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचा टॉपलेस फोटो शेअर केला. या फोटोने अनेकांनी तोंडात बोटं घातली. पुढे अशेच काही फोटो तिने पोस्ट केले. यामध्ये एका फोटोत साराच्या हातात फक्त बॅट होती आणि कॅप्शनमध्ये लिहिलं होतं, Waiting to go into bat… दुसर्या फोटोत साराच्या अंगावर एकही कपडा नव्हता आणि तिच्या हातात फक्त विकेटकीपिंग ग्लोज होते. अशा प्रकारे साराने तिच्या मादक अदांनी सोशल मीडियावर धुराळा उडवला.
(England Women Cricketer Sarah Taylor birthday Today)
हे ही वाचा :
23 रन्सवर सगळा संघ ऑलआऊट, भले भले दिग्गज गारद, 5 खेळाडू शून्यावर आऊट!, वाचा त्या मॅचबद्दल…
रोहित शर्मा की विराट कोहली, सर्वोत्तम कर्णधार कोण? मोहम्मद शमीचं बेधडक उत्तर