BCCI च्या अध्यक्षपदी माजी कर्णधार सौरव गांगुलीची निवड

जगातील सर्वात शक्तीशाली क्रिकेट बोर्ड भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयच्या अध्यक्षपदी टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची नियुक्ती (Sourav ganguly bcci president) करण्यात आली आहे.

BCCI च्या अध्यक्षपदी माजी कर्णधार सौरव गांगुलीची निवड
Follow us
| Updated on: Oct 14, 2019 | 4:50 PM

नवी दिल्ली : जगातील सर्वात शक्तीशाली क्रिकेट बोर्ड भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयच्या अध्यक्षपदी टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची नियुक्ती (Sourav ganguly new bcci president) करण्यात आली आहे. रविवारी (13 ऑक्टोबर) मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डाचा अध्यक्षपद निवडण्यासाठी बैठक (Sourav ganguly new bcci president) झाली होती.

या बैठकीवेळी अध्यक्षपदाच्या शर्यतीत बीसीसीआयचे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि एन श्रीनिवास हे गट आमने-सामने होते. श्रीनिवासन गटाकडून ब्रजेश पटेल तर ठाकूर गटाकडून प्रिन्स ऑफ कोलकाता सौरव गांगुली यांचे नाव सुचवले जात होते. अखेर काल झालेल्या सर्व नाट्यमय घडामोडीनंतर सौरव गांगुलीच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

क्रिकेटमधील या दोन दिग्गज गटांनी आपआपले उमेदवार अध्यक्षपदी बसवण्यासाठी चांगलाच जोर लावला होता. अखेर यामध्ये क्रिकेटमधील दादा अर्थात सौरव गांगुलीने बाजी मारली. मात्र त्याचवेळी ब्रजेश पटेल यांना आयपीएलचे चेअरमन बनवण्यावरही सहमती झाली.

दरम्यान, गृहमंत्री अमित शाह यांचे सुपुत्र जय शाह बीसीसीआय सचिव, तर अनुराग ठाकूर यांचे बंधू अरुणसिंह ठाकूर यांच्या गळ्यात कोषाध्यक्षाची माळ पडू शकते.

बीसीसीआयच्या अध्यक्षपदी गांगुलीच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. आता पुढील 10 महिन्यांसाठी अध्यक्षपदाची धुरा गांगुली सांभाळेल. सध्या गांगुली बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष आहे. गांगुलीने स्वत: भारतीय संघाचं कर्णधारपद भूषवलं आहे. त्यामुळे गांगुलीला मैदानातील अनुभव तर आहेच, पण प्रशासनातील अनुभव त्याच्या पाठिशी आहे.

गांगुली-अमित शाह भेट

अध्यक्षपदाच्या शर्यतीत श्रीनिवासन गटाने प्रचंड जोर लावला होता. श्रीनिवासन यांनी शनिवारी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन ब्रजेश पटेल यांची दावेदारी सादर केली होती. मात्र गांगुलीनेही स्वत: अमित शाह यांची भेट घेऊन बीसीसीआय अध्यक्ष होण्याची इच्छा व्यक्त केली होती.

गांगुलीला अनुराग ठाकूरांची साथ

गांगुलीला भाजप खासदार आणि विद्यमान केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांचीही साथ होती. अनुराग ठाकूर हे मोदी-शाहांच्या मंत्रिमंडळात असल्याने केंद्रात त्यांच्या शब्दाला मान आहे. त्याचा फायदा गांगुलीला झाला.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.